Just another WordPress site

शेजारील राज्यातील छुप्या आयातीतून यावल तालुक्यात लाखो रुपयांच्या गुटख्याची सर्रास विक्री

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.५ डिसेंबर २३ मंगळवार

तालुक्यात न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या व शेजारील राज्यातुन तस्करीतून आयात करून विक्रीस येणाऱ्या व मौखिक आरोग्याच्या समस्या तसेच विविध गंभीर स्वरूपाचे आजार निर्माण करणारा विमल पानमसाला गुटख्याची सर्रासपणे त्याचबरोबर उघडउघड सार्वजनिक ठीकाणी पानटपऱ्यापासुन तर किराणा दुकानात लाखो रुपयांच्या पानमसाला पुडयांची विक्री करण्यात येत असुन या नागरीकांच्या आरोग्याशी निगडीत विषयाकडे संबधीतअन्न व औषद्य प्रशासन विभागाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याची ओरड तालुक्यातील अनेक पालक व सुज्ञ नागरीकांकडून करण्यात येत आहे तर कार्यवाही कोण करणार ? असा प्रश्न तालुकावासीयांमधून उपस्थित केला जात आहे.

यावल,चोपडा व रावेर हे तिन्ही तालुके सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असुन सिमा रेषेवरील गुजरात आणी मध्यप्रदेश या दोन राज्यातुन मोठया प्रमाणावर न्यायालयाने प्रतिबंधीत केलेल्या विमल गुटका या पानमसालाची खाजगी वाहन व प्रसंगी एसटीव्दारे चोरट्या मार्गाने वाहतुक करून यावल तालुक्यातील काही गुटका किंगकडून करण्यात येत असून तालुक्यात विविध ठिकाणी विक्रीसाठी या गुटक्याची टप्प्या टप्याने वाटप करण्यात येत असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळत आहे.शेजारील राज्यांमधून छुप्या मार्गाने आयात करून येणाऱ्या या हानीकारक पानमसाला गुटख्याची एका महिन्यास सुमारे ५० ते ६० लाखाची विक्री करण्यात येत असल्याची जोरदार चर्चा तालुक्यामध्ये चर्चिली जात आहे. याबाबतची माहीती साधारण तालुकावासीयांना असून मात्र संबधीत अन्न व प्रशासन विभागाला नसावी ? हा तालुकावासीयांच्या चर्चेचा विषय बनला आहे.तर या विषयाकडे संबंधित विभाग हा अर्थपुर्ण डोळेझाक करीत असल्याचे तालुकावासीयांमध्ये बोलले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.