यावल-पोलीस नायक (तालुका प्रतिनिधी) :- तालुक्यातील चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे यांच्या खुनाने संपुर्ण परिसराला हादरून सोडले होते.यात या खुनातील चौथ्या संशयित आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे.
चितोडा येथील रहिवाशी मनोज भंगाळे या तरुणाचा दि.२१ रोजी सांगवी येथील शेतकरी चंद्रकांत निंबा चौधरी यांच्या कपाशीच्या शेतामध्ये उसनवारीच्या पैशांच्या वादातून अत्यंत निर्दयी प्रकारे खून करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी वेगवेगळ्या माध्यमातून तपासचक्रे फिरवून याआधी एक महिला व दोन पुरुष यांना अटक केलेली असून त्यांना २९ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
आज दि.२४ रोजी यावल शहरातील नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड परिसरातून चौथा संशयित आरोपी जितेंद्र भगवान कोळी रा.अट्रावल यास गुप्त माहितीच्या आधारे यावेळचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर,पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्दर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने आरोपीला पकडण्यात यश मिळविले आहे.तर अजून आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.