Just another WordPress site

आगामी निवडणुकीपुर्वी मतदारांना नवीन मतदार ओळखपत्र पुरविण्यात यावे-युवक काँग्रेसची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.५ डिसेंबर २३ मंगळवार

देशात व राज्यात आगामी काळात होवु घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभमीवर निवडणुक आयोगाच्या वतीने १ जानेवारी २०२४ पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुण तरुणींकरीता मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात येत असुन मतदान ओळखपत्र मिळवण्यासाठी जनजागृती करून विविध ठीकाणी शिबीराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी युवक काँग्रेसचे यावल तालुका अध्यक्ष फैजान शाह यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाह यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यात निवडणुक आयोगाच्या आदेशान्वये आगामी काळात होवु घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर १८ वर्ष पुर्ण झालेल्या तरुण तरूणींसाठी मतदार नोंदणी सुरू करण्यात आली असून या निमित्ताने महसुल प्रशासनाने विविध ठिकाणी मतदार नोंदणी शिबिर राबविण्यात यावे अशी मागणी केली आहे.पुढच्या वर्षी महाराष्ट्रातील विधानसभा व लोकसभा निवडणूक होणार असुन निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्याचा अधिकार प्राप्त व्हावा यासाठी जनतेला मतदार ओळखपत्र मिळवण्यासाठी आवश्यक काही अडीअडचण येऊ नये यासाठी यावल तालुक्यातील विविध शहरामध्ये गावांमध्ये मतदार नोंदणीसाठी नोंदणी शिबिर राबिवणे अत्यंत गरजे असून संबंधित बिएलओ यांची तात्काळ मतदार नोंदणी व दुरुस्ती संदर्भात सर्वेक्षण करण्यासाठी नियुक्ती करणे गरजे आहे अशी मागणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्याकडे यावल-रावेर विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष फैजान शाह यांनी केली आहे.निवडणुकी दरम्यान जनतेला मतदानाविषयी काही अडचणींना सामोरे जावे लागु शकते याकरीता दक्षता घेणे प्रशासनाची जबाबदारी असून या मतदार नोंदणी विषयी युवक काँग्रेसच्या वतीने जनजागृती करून मतदार नोंदणीस सहभाग घेवुन जनतेला आपले कर्तव्य पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन फैजान शाह यांनी युवकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.