यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.६ डिसेंबर २३ बुधवार
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वंचित बहुजन आघाडी व माथाडी कामगार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.६ डिसेंबर बुधवार रोजी सकाळी वाजता विश्वरत्न,विश्ववभूषण,महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे विनोद सोनवणे,महिला आघाडी जिल्हाध्यक्षा वंदनाताई सोनवणे,माथाडी कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष बालाजी पठाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका अध्यक्ष भगवानभाऊ मेघे यांच्या अध्यक्षतेखाली आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली.याप्रसंगी माथाडी कामगार भूषण साळुंखे,राजू बारी,वंचित बहुजन महासचिव बाबुलाल पटेल आढाळे,सुजित मेघे,राजेश गवळी,सचिन बहारे,हमीद तडवी,रमेश जाधव,सूर्यभान सपकाळे,बिलाल सिंग पावरा,खनित्रा पावरा,होरसिंग पावरा,रवींद्र भालेराव,प्रकाश तायडे,कुलदीप मेघे,दीपक बारी,विकास गजरे,प्यारा पटेल आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.