अमरावती जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याबाबत आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मागणी
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.८ डिसेंबर २३ शुक्रवार
अमरावती जिल्हा ओला दुष्काळ घोषित करा तसेच अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी यासह जिल्ह्यातील लोकाभिमुख मागण्या ज्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील,राज्यातील समाजाभिमुख मागण्याला मंजुरी देण्यात यावी अशी मागणी आमदार रवीभाऊ राणा यांच्या वतीने मुख्यमंत्र्यांना अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काल दि.७ डिसेंबर गुरुवार रोजी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
सदर निवेदनात सिंबोरा धरणापासून अमरावती शहरापर्यंत नविन पाईप लाईन टाकणेकरिता १००० कोटी रुपये मंजूर करणे,अमरावती विभाग अंतर्गत दूष्काळ घोषित करणे,सरसकट शेतकर्यांना आर्थिक मदत देणे,कोळी महादेव समाजाच्या जात प्रमाणपत्र समस्या सोडवणे,चिखलदरा स्कायवॉक सूरू करणे,गणोरी सरकारी दवाखाना ईमारत निधि मंजुर करणे,नवीन बस डेपो व एस टि कर्मचारी यांच्या समस्या सोडवणे, शासकीय मेडीकल ऑफिसर यांचा पिजी शिक्षण व ईतर मागण्या मंजुर करणे,जिल्ह्यातील शासकिय अधिकारि रिक्त जागा भरणे,हनुमान गडी तीर्थक्षेत्र दर्जा देणे,आरोग्य विभागाचे आरोग्य सेविका,आरोग्य सहाययक महिला व पुरुष,आरोग्य सेवक व हिवताप हत्तीरोग,प्रयोगशला तंत्रज्ञ व इतर कर्मचाऱ्यांच्या मागण्या मंजूर करणे,तीर्थस्तळ विकास आराखडा तयार करणे,रूनमोचन,सामदा काशिपुर,कोंडेशोर जिल्यांतील इतर स्थळांचा विकास करणे,गाडगेबाबा महाराज यांचा पुतळा बांधकाम करण्यासाठी निधि मंजुर करणे,अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मंजुर करणे आदि महत्वाचे निर्णय घेण्यात यावे यासाठी काल दि.७ डिसेंबर गुरुवार रोजी आमदार रवीभाऊ राणा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी आमदार रवीभाऊ राणा यांच्यासमवेत शेखर बिसने व उमेश ढोणे हे उपस्थीत होते.