Just another WordPress site

नविन पेन्शन योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी १४ डिसेंबर पासून ग्रामसेवक संघटना बेमुदत संपावर

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.९ डिसेंबर २३ शनिवार

राज्य सरकारचे सर्व शासकीय कर्मचारी,निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांसाठीची नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करण्यात यावी यासह विविध न्यायिक मागण्यांसाठी दि.१४ डिसेंबर २३ गुरुवार पासुन बेमुदत संपावर जात असुन या संपास यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन ग्रामसेवक संघटनेच्या वतीने नुकतेच पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.

यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,राज्य शासनाच्या अंतर्गत प्रशासकीय सेवा बजावणाऱ्या शासकीय,निमशासकीय,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाने लागू केलेली नविन पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागु करावी यासह विविध न्यायिक मागण्यांसाठी येत्या १४ डिसेंबर गुरुवार रोजी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार असल्याचा निर्णय नुकताच संघटनेच्या वतीने घेण्यात आला आहे.सदरहू या संपात मध्यवर्ती जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ यांनी पुकारलेल्या संपात यावल तालुका ग्रामसेवक संघटना सहभागी होणार असल्याबाबतचे निवेदन काल दि.८ डिसेंबर शुक्रवार रोजी यावल पंचायत समितीचे सहाय्यक प्रशासन अधिकारी ज्ञानेश्वर निळे व कार्यालय अधिक्षक जि.एम.रिंधे यांना देण्यात आले.यावेळी तालुका ग्रामसेवक संघटनेचे सचिव लक्ष्मीकांत महाजन,उपाध्यक्ष रविंद्र बाविस्कर,मानद अध्यक्ष शिवाजी सोनवणे,जिल्हा उपाध्यक्ष दिपक तायडे,ग्रामसेवक पतपेढी पारोळाचे संचालक भाईदास पारधी,मानद सचिव राजु तडवी,तालुका कार्याध्यक्ष डी.डी.पाटील,वरिष्ठ सहाय्यक पि.आर.चौधरी, पगारदार नोकरांच्या पतपेढीचे व्हाईस चेअरमन पी.व्ही.तळेले,संघटनेच्या महीला संघटक सुषमा कोळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.