Just another WordPress site

“हे तर मराठ्यांनाच मराठ्याविरोधात अंगावर घालण्याचे काम चालू”-मनोज जरांगे-पाटील यांची टीका

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार

हिवाळी अधिवेशनात अंतरवाली सराटीत झालेल्या लाठीचार्जबाबत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या लेखी उत्तराने नव्या वादाला तोंड फुटले असून मराठा आंदोलनात करण्यात आलेला लाठीचार्ज हा बचावात्मक आणि वाजवी असल्याचे फडणवीसांनी सांगितले आहे यावरून मराठा नेते मनोज जरांगे-पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली आहे.विधिमंडळ अधिवेशनाच्या लेखी प्रश्नोत्तरात आमदारांनी मराठा आंदोलनावेळी झालेल्या घटनांबाबत गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे माहिती मागवली होती.या प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले,जालना जिल्ह्यातील सदर आंदोलनात हिंसक जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत ७९ पोलीस अधिकारी आणि अंमलदार जखमी झाले आहेत.अंतरवाली सराटीत पोलिसांनी बचावात्मक पद्धतीने बळाचा वाजवी वापर केला त्यात ५० आंदोलक जखमी झाले.यावरून जरांगे-पाटलांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना फडणवीसांना लक्ष्य केले आहे.देवेंद्र फडणवीस काड्या करत राहिले तर पुढे काय काय होते ते पाहा तुमचा डाव उधळून लावणार आहे तरच मराठ्याचे असल्याचे सांगणार असे जरांगे-पाटलांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांवर टीका कराल तर आम्ही सहन करणार नाही.फडणवीसांविरोधात भूमिका घेण्यास सुरूवात कराल तर गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा भाजपा आमदार नितेश राणेंनी जरांगे-पाटलांना दिला आहे.राणेंच्या वक्तव्यावर बोलताना जरांगे-पाटील म्हणाले,मराठ्यांनी सावध राहावे कारण देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांविषयी गरळ ओकण्याचा अंदाज दिसतोय.बरेचशे नेते आता जागे होत असून मराठ्यांनाच मराठ्याविरोधात अंगावर घालण्याचे काम चालू आहे पण किती जणांना अंगावर घालणार हे मी पाहतो.आम्ही शांत आहोत आणि राहुद्या अशी विनंती जरांगे-पाटलांनी फडणवासांना केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.