साने गुरुजी साहित्य नगरी,अमळनेर तालुका (प्रतिनिधी) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार
अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी प्रतिनिधी नोंदणी,ग्रंथदालन नोंदणी,बालमेळावा नोंदणी, कवीकट्टा नोंदणी,गझलकट्टा नोंदणी तसेच टेंडर प्रक्रिया आदी प्रकारच्या नोंदणीची प्रक्रिया सुरु झाली असून ही प्रक्रिया ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येणार आहे.सदरील माहिती https://marathisahityasammelan.org/ या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याची माहिती म.वा.मंडळाचे अध्यक्ष डॉ.अविनाश जोशी यांनी नुकतीच दिली आहे.
मराठी साहित्य संमेलनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातील साहित्यिक,लेखक,साहित्यप्रेमी हजेरी लावतात.बाहेर गावावरुन येणाऱ्यांसाठी निवास व भोजन व्यवस्थेकरिता प्रतिनिधी नोंदणी करणे आवश्यक असल्याने ही नोंदणी ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने करता येणार आहे तसेच ज्या लेखक,प्रकाशक व विक्रेत्यांना ग्रंथदालन हवे असल्यास त्यांनीही ग्रंथदालन नोंदणी करणे आवश्यक आहे.ग्रंथदालनांची संख्या मर्यादित असल्याने इच्छिुकांनी ग्रंथदालन आरक्षित करावे त्याचबरोबर प्रतिनिधी नोंदणी,ग्रंथदालन नोंदणी,बालमेळावा नोंदणी,कवीकट्टा नोंदणी,गझलकट्टा नोंदणी तसेच टेंडर प्रक्रिया आदी माहितीसाठी https://marathisahityasammelan.org/ या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन म.वा.मंडळातर्फे करण्यात आले आहे.