Just another WordPress site

“..तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेल”-

भाजपा आमदार प्रसाद लाड यांचे संजय राऊत यांना जोरदार प्रतिउत्तर

नागपूर-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.११ डिसेंबर २३ सोमवार

 

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड आणि त्यांच्या कंपनीवर केलेल्या भ्रष्टाचाराचा आरोप केला असून या आरोपानंतर आमदार प्रसाद लाड आक्रमक झाले आहेत.संजय राऊत यांनी माझे किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतले तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेन तसेच मी उद्या सकाळपर्यंत माझ्या वकिलांशी बोलून २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे असेही प्रसाद लाड म्हणाले.नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना प्रसाद लाड म्हणाले की,शिवसेना खासदार संजय राऊतांची पत्रकार परिषद ऐकली तसेच काही पत्रकारांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली की,संजय राऊत सातत्याने माझा आणि माझ्या कंपनीचा उल्लेख करत आहे.प्रसाद लाड आणि क्रिस्टल कंपनीचा १ हजार कोटींचा भ्रष्टाचार वगैरे.संजय राऊतांच्या संसदीय भाषेत बोलायचे झाले तर संजय राऊत *** झालाय.ज्या गोष्टीचा काही संबंध नाही ज्याला कसल्याही माहितीचा आधार नाही.कशामध्ये नाव घ्यायचे ? कशात नाही घ्यायचे ? हे कळत नाही.अशा माणसाला हीच संसदीय भाषा वापरली पाहिजे अशी तिखट प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिली आहे.

प्रसाद लाड पुढे म्हणाले,आपल्या माध्यमातून मी संजय राऊतांना सांगू इच्छितो की यापुढे त्यांनी माझे किंवा माझ्या कंपनीचे नाव घेतले तर स्वप्नातला संजय राऊत काय आहे? हे मी प्रसारमाध्यमांसमोर आणेल त्याचे व्हिडीओ लोकांसमोर आणेल.मी माझ्या वकिलांशी चर्चा करून उद्या सकाळपर्यंत संजय राऊतांविरोधात २०० ते ५०० कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.उधळलेल्या रेडकूला मारण्यासाठी भाल्याचा वापर केला जातो अशा रेडकूला भाल्याने मारण्याची वेळ आली आहे त्यामुळे आक्रमक भूमिका घेत आहे.मेहनतीने उभे केलेल्या साम्राज्याला कुणी खोटारडेपणाने डाग लागत असेल तर छत्रपतींनी दिलेली शिकवण आहे अंगावर आले तर शिंगावर घ्यायचे असेही आमदार प्रसाद लाड यांनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.