“अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू”-शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिंदे सरकारला थेट इशारा
नागपूरमध्ये राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असून शिवसेना (ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांची दिशा सालियान मृत्यू प्रकरणात विशेष तपास पथकामार्फत ( एसआयटी ) चौकशी होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे यावरून शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारला थेट इशारा दिला आहे.आम्ही सांगू तेव्हा तुमच्याही कुटुंबाच्या एसआयटी चौकशा लावू असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे ते विधिमंडळाच्या बाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.उद्धव ठाकरे म्हणाले,ज्यांच्यापासून भीती असते त्यांच्यावर आरोप केले जातात पण आम्हालाही एसआयटी चौकशा लावता येतील त्यामुळे त्यांनी त्याच्यात जाऊ नये अन्यथा आम्ही सांगू तेव्हा तुमच्या कुटुंबीयांची एसआयटी चौकशी लावू.
शिवसेनेच्या खासदारांनी मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे ज्यांना आरक्षण असेल त्यांना आरक्षण द्यावे पण कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायला हवे अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे.प्रफुल्ल पटेलांवरून उद्धव ठाकरेंनी भाजपाला घेरले आहे.नवाब मलिकांना दूर ठेवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना पत्र लिहिले होते.तोच न्याय प्रफुल्ल पटेलांबाबत लावणार आहात की नाही? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपाला विचारला आहे.