Just another WordPress site

शासनाच्या किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेअंतर्गत भरडधान्य खरेदी नाव नोंदणीस सुरूवात

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१५ डिसेंबर २३ शुक्रवार

तालुक्यात किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी,मका) खरेदीसाठी नोंदणीस सुरुवात करण्यात आली असुन २३-२४ वर्षाच्या हंगामात केंद्र शासनाकडुन किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (खरीप) हंगाम भरडधान्य (ज्वारी, मका) खरेदी केंद्र यावल,उपअभिकर्ता संस्था म्हणून दि.१३ डिसेंबर २३ रोजीच्या जिल्हा पणन अधिकारी यांचेकडून पाप्त ईमेल संदेशानुसार तालुक्यातील कोरपावली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मार्फत नोंदणी सुरू झालेली आहे.

दरम्यान शासकीय हमीभाव ज्वारी-३१८०,मका-२०९० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे असुन शेतकऱ्यांनी नाव नोंदणीसाठी आधार कार्ड झेरॉक्स,बॅक पासबुक झेरॉक्स,पिकाचा ऑनलाईन चालु २३-२४खरीप हंगामाचा (ज्वारी,मका) या पिकाचा पेरा नोंदविलेला ७/१२ उतारा तलाठी यांची स्वाक्षरी असलेला तसेच ऑनलाईन नोंदणीकरीता शेतकऱ्याचा प्रत्यक्ष LIVE फोटो अपलोड करणे आवश्यक आहे त्याशिवाय नोंदणी पुर्ण होत नाही.सदर नोंदणीसाठी त्वरीत संस्थेशी संपर्क करावा.शेतमालाची रक्कम आपण दिलेल्या बँक खाती ऑनलाइन पद्धतीने जमा होणार असल्यामुळे बँक खात्याची माहिती बिनचूक देण्यात यावी तसेच बॅक अकाऊंट चालू स्थितीत व पुर्ण अंकी असावे अन्यथा आपली रक्कम जमा होण्यास विलंब होईल किंवा चुकीच्या बँक खात्यामध्ये रक्कम वर्ग होऊ शकते.दरम्यान नोंदणीचा अंतीम दि.३१ डिसेंबर २३ पर्यंत विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कोरपावली तालुका यावल जिल्हा जळगाव येथे करता येईल असे आवाहन विकासचे चेअरमन राकेश फेगडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.