मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजप सरकार हे हुकूमशाही सरकार असून देशात हिटलरशाही सुरू आहे. देशातील बेरोजगारी व भ्रष्टाचारावर उपाययोजना करण्याचे सोडून मोदी सरकार द्वेषाचे व फुटीचे राजकारण करत आहे परिणामी यांच्या विरोधात भारत जोडो यात्रा सुरु करावी लागली असे वक्तव्य काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी नुकतेच केले आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला समर्थन देण्यासाठी मुंबई काँग्रेससह डावे पक्ष व विविध स्वयंसेवी संस्था यांनी मुंबईत गवालिया टँक ते मंत्रालयाजवळील महात्मा गांधी यांचा पुतळा असे भारत जोडो यात्रेचे आयोजन केले होते त्यानिमित्ताने दिग्विजयसिंग बोलत होते.बेरोजगारी व भ्रष्टाचाराने कळस गाठला असून गरीब-श्रीमंत यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढतच आहे.अशा परिस्थितीमध्ये देशाचे संविधान,लोकशाही वाचविण्यासाठी, द्वेषाच्या व फुटीच्या राजकारणामुळे विभाजित झालेल्या देशाला जोडण्यासाठीच आम्ही इतर सर्व पक्षांना एकत्र घेऊन ही ‘नफरत छोडो,भारत जोडो’ यात्रा काढली आहे.या यात्रेमध्ये भाजपची बी टीम असलेले आप,एमआयएम हे दोन पक्ष आणि भाजपला विकले गेलेले काही फुटीर सोडून सर्व पक्ष सहभागी झाले आहेत असे दिग्विजयसिंग यांनी म्हणाले आहे.
या भारत जोडो यात्राला मुंबई काँग्रेस यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस,शिवसेना,जनता दल(सेक्युलर),समाजवादी पक्ष,कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (कवाडे गट),रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (गवई गट),शेतकरी कामगार पक्ष हे सर्व राजकीय पक्ष सहभागी झाले होते.तसेच २१ सामाजिक संस्थांनी या यात्रेत सहभाग घेतला.मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी यात्रेत सहभागी झालेल्या सर्व पक्षांतील नेत्यांचे,संघटनांचे व हजारो कार्यकर्त्यांचे आभार मानले आहे.