दुसखेडा-कासवा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करणेबाबत राष्ट्रवादी काँग्रेस व ग्रामस्थांतर्फे आंदोलनाचा इशारा
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
तालुक्यातील दुसखेडा व कासवा परिसरातील सुमारे विस गावांशी संपर्क जोडणारा अकलुद ते दुसखेडा रस्त्याचे मंजुर झालेले काम मागील तिन वर्षापासुन अर्धवट अवस्थेत पडून असल्याने नागरीकांना या खराब झालेल्या रस्त्यामुळे अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. परिणामी निंद्र अवस्थेत असलेल्या प्रशासनास जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अकलुद,दुसखेडा व कासवा परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने दुसखेडा-कासवा रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या यावल कार्यालया समोर ठीय्या आंदोलन करण्यात येईल असे नुकत्याच देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रा.मुकेश येवले,तालुका सरचिटणीस विनोद पाटील पदधिकारी यांच्यासह दुसखेडा सरपंच,वढोदे प्रगणे सरपंच,कासवा सरपंच यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ मंडळींनी यावल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या दुसखेडा ते अकलुद फाटा ( राष्ट्रीय मार्ग क्रमांक ४ रस्ता प्रतिम १४) हा रस्ता गेल्या दोन ते तिन वर्षापासुन मंजुर झालेला असुन रस्त्याचे काम अद्याप अपुर्ण व अर्धवट अवस्थेत असल्याने वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.सदरहू वारंवार वाहनांचे अपघात या रस्त्यावर होत असल्यामुळे या रस्त्याशी जुडलेल्या सुमारे विस गावांच्या ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परिणामी ग्रामस्थांच्या या गंभीर विषयाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग लक्ष देत नसल्याने अखेर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी व या अर्धवट कामास पुर्ण करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष,विविध गांवांचे सरपंच व ग्रामस्थांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम यावलच्या कार्यालयासमोर दि.२७ डिसेंबर २३ रोजी ठीय्या आंदोलन करण्यात येणार आहे.याबाबत यावल कार्यालयातील वरिष्ठ लिपिक विकास जंजाळे यांना देण्यात आलेल्या निवेदनावर परिसरातील विविध ग्रामपंचायतचे सरपंच व असंख्य ग्रामस्थांच्या स्वाक्षरी आहेत.