समतोल प्रकल्पाचे प्रदिप पाटील यांनी रुपये व कागदपत्रे संबंधिताच्या स्वाधीन करून दाखविला प्रामाणिकपणा;नागरिकांकडून कौतुक
जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२० डिसेंबर २३ बुधवार
येथील केशवस्मृति प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्प व्यवस्थापक प्रदिप पाटील यांनी एका पाकीटात सापडलेले अकराशे रुपये,आधारकार्ड व अन्य महत्त्वाची कागदपत्रे प्रामाणिकपणे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहचवून आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला आहे.सदरहू प्रदीप पाटील केलेल्या या स्तुत्य कार्याचे परिसरात कौतुक केले जात आहे.
कानळदा जठाधारी मंदिर येथे सुरू असलेल्या पूज्य पंडित प्रदिप मिश्रा यांच्या शिव महापुराण कथेत प्रदिप पाटील सेवा देण्याचे कार्य बजावत होते त्यावेळी त्यांना दि.१० डिसेंबर २३ रोजी त्या गर्दीत दोन पाकीट सापडले त्यातील एक पाकीट त्याच ठिकाणी परत केले व एका पाकिटाचा शोध लागत नव्हता त्यात अकराशे रुपये रोकड,आधारकार्ड व महत्वाची कागदपत्रे आढळून आली.सदरील आधारकार्ड पुराव्यानुसार हे पाकीट पिंपळकोठा,चांदसर येथील मिराबाई चव्हाण यांचे असल्याचे निष्पन्न झाले.सदरहू याबाबत सर्व खातरजमा करून काल दि.१९ डिसेंबर २३ मंगळवार रोजी प्रदीप पाटील यांनी ते पॉकेट व्यवस्थितरित्या प्रामाणिकपणे त्यांना सुपूर्द करून आपला प्रामाणिकपणा दाखवून दिला. त्याचबरोबर या कथेदरम्यान प्रदीप पाटील यांनी सहा मुलांना त्यांचा हरविलेला परिवार मिळवून देण्यात मोलाचे सहकार्य केले हे विशेष ! सदरहू प्रदीप पाटील यांच्या कौतुकास्पद कामगिरीचे जिल्हाभरात सर्व थरातून विशेष कौतुक होत आहे.