यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२१ डिसेंबर २३ गुरुवार
तालुक्यातील डोंगर कठोरा सह परिसरात आज दि.२१ डिसेंबर गुरुवार रोजी वीजचोरी रोखण्यासाठी आकोडे धारकांवर वीज वितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या वतीने धडक मोहीम राबविण्यात आली.यात काही जणांच्या केबल जप्त करण्यात आल्या व समज देऊन सोडून दिले असल्याबाबत वीज अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
याबाबत वीज अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की,आज दि.२१ डिसेंबर गुरुवार रोजी उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील डोंगर कठोरा येथे वीज चोरीस पायबंद बसावा या उद्देशातून संपूर्ण गावातून आकोडे धारकांच्या विरोधात धडक मोहीम राबविण्यात आली.यात काही आकोडे धारकांच्या केबल जप्त करण्यात आल्या असून त्यांना प्राथमिक स्वरूपात समज देण्यात आलेली आहे.सदरील मोहिमेमध्ये उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील यांच्यासह सहाय्यक अभियंता आकाश नेहेते,पंकज बाविस्कर,प्रसन्न पाटील,ऋतुजा पाटील,लाईनमन आमीन तडवी,वरिष्ठ तंत्रज्ञ राजेंद्र डोळसे,उमेश पाटील,ललित बऱ्हाटे,माधव टोके व मोहिनी सूर्यवंशी यांनी सहभाग नोंदविला.