Just another WordPress site

किनगाव येथे धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून दंगल प्रकरणी १८ जणांविरुध्द गुन्हा दाखल

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२२ डिसेंबर २३ शुक्रवार

तालुक्यातील किनगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्यासमोर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये प्रचंड हाणामारी होऊन झालेल्या दंगलीमध्ये दोन जण जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.याप्रकरणी दोन्ही गटाकडून यावल पोलिस ठाण्यात तब्बल १८ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की.तालुक्यातील किनगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सार्वजनिक जागेवर धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला व याचे पर्यावसान हाणामारीमध्ये होऊन झालेल्या दंगलीमध्ये लोखंडी कडे व फायटरचा वापर झाल्याने यात सागर सपकाळे वय २१ व उखा जाधव वय ५० हे दोन जण जखमी झाले.यातील जखमी २१ वर्षीय सागर सपकाळे या तरुणाला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आणण्यात आले व याप्रकरणी जखमी सागर बापू सपकाळे याच्या फिर्यादीवरून तोताराम पाटील,ऋषिकेश कुंभार,किरण कंडारे,सागर जाधव,गजू जाधव,उखा कैकाडी,निलेश कंडारे या सात जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तर दुसऱ्या गटाकडून उखा रामलाल जाधव वय ५० यांच्या फिर्यादीवरून रोहित दिलीप वानखेडे,रोहन राजू निकम,सागर बापू सपकाळे,प्रशांत जीत सोनवणे,विशाल तायडे,गणेश दिलीप साळुंखे,राहुल बापू साळुंखे,नाना मधुकर साळुंखे,गोल्या विजु साळुंखे,बापू सपकाळे व सागर राजू निकम या ११ जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही गटाकडून एकमेका विरुद्ध फिर्याद दिल्याने एकुण १८ जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमाने गुन्हे दाखल करण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नरेंद्र बागुले व पोलिस करित आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.