यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
तालुक्यातील कोरपावली येथील भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व सहकार क्षेत्राच्या चळवळीत दांडगा अनुभव असलेले यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक तथा कोरपावली विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे यांची भाजपा पक्षाच्या सहकार आघाडी जळगाव जिल्हा पुर्व विभागाच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.
राकेश वसंत फेगडे यांची ही निवड भारतीय जनता पक्षाचे जळगाव जिल्हा पुर्व अध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे यांनी केली आहे.महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन,पक्षाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,महाराष्ट्र प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे,रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे,जळगावचे खासदार उन्मेश पाटील,जळगावचे आमदार सुरेश भोळे (राजुमामा भोळे),भुसावळचे आमदार संजय सावकारे,चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण,जिल्हा उपाध्यक्ष शरद महाजन,किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष नारायण चौधरी, जेष्ठ पदाधिकारी हिरालाल चौधरी,तालुका अध्यक्ष उमेश फेगडे यांच्यासह पक्षातील विविध पदाधिकारी यांनी राकेश फेगडे यांचे स्वागत केले आहे.