Just another WordPress site

यावल शहरात आरोग्य विभागाच्या कारवाईत बंगाली बोगस डॉक्टराला अटक

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२३ डिसेंबर २३ शनिवार

शहरात गेल्या दहा वर्षापासुन औषध उपाचाराच्या नावाखाली रूग्णांची आर्थिक लुट करणाऱ्या बंगाली बिजनकुमार राय राहणार कोलकत्ता (पश्चीम बंगाल) मुन्नाभाई एमबीबीएस या बोगस डॉक्टरवर येथील तालुका आरोग्य विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली असुन सदरील  बोगस डॉक्टरच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येवुन त्यास अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु तडवी यांच्याकडे यावल येथील तालुका मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.रमेश पाचपोळे यांनी दिलेल्या माहीतीवरून यावल शहरातील नगरपरिषदच्या व्यापारी संकुलनात बंगाली नावाने ओळखला जाणारा बिजन निमलचंद राय राहणार कोलकत्ता (पश्चिम बंगाल) ह.मु.धनगरवाडा यावल हा ईसम डॉक्टर असल्याचे भासवुन ग्रामीण क्षेत्रातील रूग्णांवर उपचार करीत असल्याचे सांगीतले.या तक्रारीवरून यावल पंचायत समिती अंतर्गत कार्यरत असलेले तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजु याकुब तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डी.सी.पाटील व तक्रारकर्ते तसेच यावल तालुका मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांच्या उपस्थित कारवाई करण्यात आली.पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्या बोगस बंगाली डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात बोगस डॉक्टरचे उपचाराचे साहित्य जप्त करण्यात येवुन त्याच्या विरूद्ध विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्या बोगस डॉक्टरास यावल पोलीसांनी अटक केली आहे.दरम्यान यावल तालुक्यात अनेक ठीकाणी बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने उघडुन अशा प्रकारे आपले व्यवसाय सुरू ठेवले असुन उपचाराच्या नावाखाली रुग्णांच्या जिवाशी खेळ करीत असल्याची माहिती देत त्यांच्यावर देखील त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी अपेक्षा वेळी मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.