Just another WordPress site

“लोकसभा निवडणुकीतील उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढतील”-उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
शाहू,फुले,आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांची पाठराखण आणि धर्मनिरपेक्षता हा आपल्या पक्षाचा आत्मा आहे.महाराष्ट्रातील समाजसुधारकांचा वैचारिक वारसा कदापि सोडणार नाही त्यासाठी कोणतीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीतील उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर नव्हे तर राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावरच लढतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दि.२२ डिसेंबर शुक्रवार रोजी जाहीर केले आहे.सध्या देशासह जगभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला मान्यता आहे.महाराष्ट्रासह देशाच्या विकासासाठी आम्ही मोदी यांच्या भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे असे पवार म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची बैठक काल दि.२२ डिसेंबर शुक्रवार रोजी मुंबईत झाली यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे असे आदेश दिले असून सत्ताधारी महायुतीत अंतर पडेल असे कोणीही वागता कामा नये.ऐक्य अबाधित राखण्यासाठी वादग्रस्त वक्तव्ये करू नये.आमचा पक्ष लोकसभेच्या किती जागा लढणार याची माहिती योग्यवेळी देऊ पण मागच्या तुलनेत जास्त जागा निवडून आणण्याचा मानस आहे असे पवार यांनी सांगितले.नागपूरच्या रेशीमबाग मुख्यालयातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या स्मारकाला अभिवादन करण्यासाठी आपण गेला नाहीत यामुळे त्या कार्यक्रमावर नाराज होतात काय असा प्रश्न विचारला असता मुळात असे निमंत्रण आम्हाला आलेले नव्हते यामुळे नाहक या मुद्द्यावर वावड्या उठविण्याचे कारण नाही असे पवार यांनी स्पष्ट केले.भारतीय संस्कृती,संस्काराचा भाग म्हणून पवार कुटुंबीय घरगुती कारणामुळे कौटुंबिक भेटी घेतात त्याला राजकीय लेबल नको.आमच्यात कुठेही मॅच फिक्सिंग नाही.आमच्यासोबत जे आले आहेत त्यांना फसवणार नाही.माझ्या भूमिकेत कुठेही बदल होणार नाही हे स्टॅम्पवर लिहून देतो असे अजित पवार म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.