यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ डिसेंबर २३ शनिवार
येथील यावल-भुसावळ मार्गावरील पंडीतनगर परिसरातील शेताच्या चारही बाजुने लावलेल्या कुंपणात विजप्रवाह सोडल्यामुळेच तरुणाचा मृत्यु झाला असल्याची फिर्याद मयताच्या नातेवाईकांनी त्या शेतकऱ्याविरूध्द यावल पोलीस ठाण्यात दिली आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,यावल शहरालगत भुसावळ मार्गावर पंडितनगर या पारिसरातील प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या मालकीच्या शेतातील कुंपणावर शेतकरणारे सचिन रमेश कोळी यांनी शेताच्या चारही बाजुस लावलेल्या कुंपणात विद्युत प्रवाह सोडल्याने अशा बेजबाबदार पणाच्या कृत्यामुळे अडावद येथील राहणारे विशाल मेढे या तरुणाचा दि.२१ डिसेंबर रोजी कुंपणात सोडलेल्या विज प्रवाहचा धक्का लागल्यानेच दुदैवी मृत्यु झाला असुन रात्री उशीरापर्यंत या तरूणाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रूग्णालयात करण्यात आले.मृत्युला कारणीभुत शेतकऱ्याविरुद्ध मयताचा सख्वा चुलत भाऊ अनिल राजु मेढे यांने यावल पोलीस ठाण्यात शेत करणाऱ्या सचिन रमेश कोळी यांच्या विरूद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरिक्षक राजेन्द्र साळुंके व पोलीस करीत आहेत.