यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २३ रविवार
खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या मार्फत दिव्यांग बांधवांसाठी कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप शिबिराचा कार्यक्रम उद्या दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी पंचायत समितीमध्ये पक्षाच्या विविध मान्यवरांच्या उपस्थित आयोजित करण्यात आला आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ सबका विकास’ या संकल्पनेतून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग,भारत सरकार यांच्या द्वारा भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम,कानपूर (ALIMCO) यांच्या मार्फत यावल येथे दिव्यांग बांधवांसाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करण्यासाठी शिबीर आयोजन करण्यात आले असून खासदार श्रीमती रक्षाताई खडसे दिव्यांग बांधवांना मार्गदर्शन करून साहित्याचे वाटप करणार आहेत.मागील काही महिन्यापूर्वी रावेर लोकसभा क्षेत्रातील सर्व तालुक्यांमध्ये रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या प्रयत्नाने मोफत पूर्वतपासणी व नोंदणी शिबीर चे आयोजन करण्यात आले होते. आता पूर्वतपासणी व नोंदणी झालेल्या यावल तालुक्यातील दिव्यांग बांधवांना उद्या दि.२५ डिसेंबर सोमवार रोजी संबंधित कृत्रिम अवयव व सहाय्यभूत साधने वाटप करणार आहेत.यावेळी भारतीय जनता पक्षाचे पुर्व विभाग जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे,श्रीमती रक्षाताई खडसे, पक्षाचे जेष्ठ उपजिल्हाध्यक्ष हिरालाल चौधरी,शरद महाजन,रविंद्र पाटील,हरलाल कोळी जिल्हा सरचिटणीस,भाजप तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, विलास चौधरी,उज्जैनसिंग राजपूत तालुका सरचिटणीस,हर्षल पाटील सभापती कृऊबा,नारायण चौधरी किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष तसेच सर्व लोक प्रतिनिधी,सर्व आघाडी प्रमुख,सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत तरी सर्व दिव्यांग बांधव लाभार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले