यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२४ डिसेंबर २३ रविवार
शहरात एका कुटूंबात मुलगा व मुलगी हे लग्न न करता लिव्ह ईन रिलेश्नशिपमध्ये पती पत्नीप्रमाणे राहात असलेल्या तरूण-तरुणीच्या कुटुंबात झालेली शाब्दीक चकमक व मारहाणी बाबत दोघ कुटूंबाच्या लोकांनी एकामेकाविरूध्द फिर्याद दिल्याने १३ जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहिती अशी की,भुसावळ येथील राहणाऱ्या रेखा सुनिल भोई ह.मु.उल्हासनगर मुंबई हे आपल्या कुटुंबासह यावल येथे मागील पाच ते सहा महीन्यापासुन यावल येथील संशयीत आरोपी चंदु पंडीत वानखेडे यांच्या घरात फिर्यादी रेखा सुनिल भोई यांची मुलगी ही लिव्ह ईन रिलेशनशिप मध्ये राहात होती.सदरहू फिर्यादी हे दि.२३ डिसेंबर रोजी ११ वाजे सुमारास आपल्या कुटुंबासह मुलगी कोमल हिला भेटण्यासाठी आले असता मुलगीस भेटू न देता फिर्यादीसह कुटुंबातील लोकांना मारहाण करून दुखापत केली.तर दुसऱ्या फिर्यादीत चंदुलाल पंडीत वानखेडे वय ४९ वर्ष राहणार यावल यांनी म्हटले आहे की,सुनिल सिताराम भोई राहणार भुसावळ,ह.मु.उल्हासनगर (मुंबई) यांच्यासह सहा जणांनी मिळुन गैरकायद्याची मंडळी जमवुन घरात घुसुन मला व माझ्या कुटुंबास शिवीगाळ व मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली.याबाबत दोघ कुटुंबातील मंडळीने परस्पर एकामेकांच्या विरूद्ध फिर्याद दिल्याने पोलीस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान यावल शहरात सार्वजनिक ठीकाणी चंदुलाल वानखेडे,विशाल वानखेडे,मोहन भोई,लोकेश भोई,रोहीत भोई, दिलीप भोई,विनोद मोरे,गिरीष भोई यांच्यासह पाच महीला या सर्वांनी आरडा ओरड करीत एकमेकांना शिविगाळ करीत मारहाण केली म्हणुन यावल पोलीस ठाण्यात या सर्वांच्या विरूध्द तिसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉ राजेन्द्र पवार,पोलीस कर्मचारी वसीम तडवी करीत आहे.