आम्हाला आमंत्रण मिळो अथवा न मिळो,आम्ही गतवर्षीप्रमाणे तिथे नतमस्तक व्हायला अगोदर जायचो तसे भविष्यात जाणार !
ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांची राम मंदिर उद्घाटन सोहळ्याबाबत स्पष्टोक्ती
मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-
दि.२६ डिसेंबर २३ मंगळवार
जे सांगत आहेत की आम्ही छातीवर बसून राम मंदिर बांधले आहे त्यांची ५६ इंची छाती त्यावेळी (बाबरी मशीद पाडताना) कुठे होती? जर बाबरी मशीदीवर हल्ला झाला असेल आणि तो माझ्या लोकांनी केला असेल तर मला त्यांचा अभिमान आहे असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते हे सांगण्याचे धाडस आहे का कोणत्या पक्षात? राम मंदिर उभे राहणे हा देशाचा स्वाभिमान आहे.देशाची आस्था आहे.या आस्थेला राजकीय वळण देण्याचे काम होत आहे.सातत्याने आमचे खच्चीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न होतोय हे जनतेला माहित आहे असेही सचिन अहिर म्हणाले.राजकीय पक्ष म्हणून सर्वांत पहिली एक कोटींची देणगी शिवसेना प्रमुखांनी त्यावेळी दिली होती त्याची किंमत आज किती येईल हे सांगता येणार नाही परंतु राम मंदिराच्या निर्माणाकरताही आमचे मोठे योगदान होते असेही अहिर यांनी स्पष्ट केले.विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंघल मातोश्रीवर येऊन बाळासाहेबांकडून सल्ला घ्यायचे.आज आम्हाला डावललण्याचा प्रयत्न करत असतील तर ठीक आहे असे ते म्हणाले.