Just another WordPress site

आपल्याला झालेला कर्करोग मुलालाही होईल या भीतीपोटी पित्याकडून दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून

सातारा-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२७ डिसेंबर २३ बुधवार

आपल्याला कर्करोग झाला असून तो आपल्या मुलालाही होईल या भीतीतून एकाने आपल्या दहा वर्षीय मुलाचा गळा आवळून खून केल्याची घटना पोलीस तपासात नुकतीच उघडकीस आली आहे.वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त तपासात खुनाचे धागेदोरे उलगडले असून विजय खताळ असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती  अशी की,हिवरे ता.कोरेगाव येथे कुंभारकी नावाच्या शिवारात विक्रम उर्फ प्रणव विजय खताळ या अल्पवयीन मुलाचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केला होता याबाबत वाठार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस पथकाने मृत मुलाच्या खुनासंदर्भात तपशिलवार माहिती घेतली तसेच जवळपासच्या साक्षीदारांकडे कसून चौकशी करण्यात आली व त्यानुसार गुन्हा हा त्याच्या वडिलांनी केल्याबाबतचा संशय बळावला.यात मुलाच्या वडिलांनी दिलेली माहिती आणि साक्षीदारांनी दिलेली माहिती यामध्ये तफावत आढळून येत होती त्यानुसार खून विजय खताळ यांनीच केल्याचा संशय बळकट झाला होता.विजय खताळ यांना अधिक विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनीच हा खून केल्याची धक्कादायक कबुली दिली.आपल्याला कर्करोग झाल्याच्या संशयाने खताळला पछाडले होते व तोच त्रास आपल्या मुलाला झाल्यास आपल्या पश्चात त्याचे पुढे कसे होईल या काळजीतूनच त्यांनी कुंभारकी शिवारामध्ये त्याचा गळा आवळून खून केला असल्याची कबुली विजय खताळ यांनी पोलिसांना दिली आहे.याबाबत वाठार पोलिसांनी विजय खताळ याला अटक केली असून त्यास २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास वाठार पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली कसून केला जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.