Just another WordPress site

नाशिक येथे जानेवारी महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.२८ डिसेंबर २३ गुरुवार

केंद्र सरकारच्या युवक आणि क्रीडा मंत्रालयातर्फे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या आयोजनाची जबाबदारी महाराष्ट्रावर सोपवण्यात आली असून त्यानुसार दि.१२ ते १६ जानेवारी या कालावधीत नाशिक येथे होणाऱ्या या महोत्सवात देशभरातील युवक सहभागी होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला असून युवकांचा सर्वांगिण विकास,संस्कृती आणि परंपरांचे जतन, युवकांच्या सुप्त गुणांना वाव देणे,राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे या उद्देशाने राष्ट्रीय युवा महोत्सव आयोजित करण्यात येतो.राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील युवांचा चमू,राष्ट्रीय सेवा योजना,नेहरू युवा केंद्र संघटना यांचे स्वयंसेवक,परीक्षक,अधिकारी,कर्मचारी असे एकूण आठ हजार जण महोत्सवात सहभागी होणार आहेत.या महोत्सवात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.महोत्सवाच्या आयोजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे त्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर समिती,राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर कार्यकारी समिती,नाशिकच्या विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली आयोजन समिती तर क्रीडा आणि युवक कल्याण विभागाचे आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.