Just another WordPress site

“पाडळसा येथे ग्रामपंचायतमध्ये सरपंचपती राजमुळे विकास कामांचा खोळंबा”-उपसरपंच व ग्रा.पं सदस्यांचा आरोप

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार

तालुक्यातील पाडळसे येथील ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त सरपंच महिला गुणवंती सुरज पाटील या वर्षंभरापासून निवडून आलेल्या आहेत. सदरहू गावाचा कारभार लोकनियुक्त सरपंच यांनीच पाहणे अपेक्षित असतांना त्यांचे पतीराज सुरज मनोहर पाटील हेच गावाचा कारभार बघत असून गावातील विकास कामांचा खोळंबा होत असल्याचा आरोप उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी नुकताच केला आहे.

याबाबत अधिक वृत्त असे की,तालुक्यातील पाडळसा येथील लोकनियुक्त सरपंच गुणवंती सुरज पाटील या निवडून आलेल्या असतांना त्यांचे पती सुरज मनोहर पाटील हेच गावचा कारभार पाहत आहेत.दरम्यान गावामध्ये राबविण्यात येणाऱ्या शासकीय योजना जसे की जलजीवन मिशन,अटल भूजल योजना,पंधरावा वित्त आयोग,ग्राम विकास मंत्रालयाकडून आलेला निधी,खासदार निधी,आमदार निधी व ग्रामनिधी याबाबत कुठलीच माहिती उपसरपंच सदस्य यांना दिली जात नाही.प्रसंगी उपसरपंच आणि सदस्यांनी सरपंचपती यांना विचारणा केली असता ते अरेरावी करतात असा आरोप उपसरपंच व सदस्यांनी केला आहे.तसेच पाडळसे ग्रामपंचायतीने पंधराव्या वित्त आयोगातून सात लक्ष रुपये खर्च करून गावामध्ये जलशुद्धीकरण (आरो प्लांट) बसवला असून आठ दिवसांमध्ये तो नादुरुस्त झाला होता या कामात देखील आर्थिक हितसंबंध जोपासले गेल्याचा आरोप उपसरपंच सदस्यांनी केला आहे.तरी पाडळसे ग्रामपंचायतमध्ये झालेल्या विकास कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेण्यात यावी अशी मागणी उपसरपंच अलका सोनवणे,सदस्य पांडुरंग कोळी,तुषार भोई,सुदेश बाविस्कर यांनी केली आहे.याबाबत लवकरच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी व यावल गटविकास अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे उपसरपंच व सदस्यांनी कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.