देशातील दहशदवाद व हुकूमशाही उलथवून टाकून स्वातंत्र्य,समता व बंधुभाव असलेली महासत्ता निर्माण करण्याकरिता खा.राहुल गांधी यांचे आवाहन
काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त "है तय्यार हम" या सभेतून 'एक विचार एक आदर्शचा संदेश
गोपाल शर्मा,पोलीस नायक
विदर्भ विभाग प्रमुख
दि.२९ डिसेंबर २३ शुक्रवार
नागपुर येथे आज दि.२९ डिसेंबर शुक्रवार रोजी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्त “है तय्यार हम” या सभेतून ‘एक विचार एक आदर्श आणि संदेश घेऊन देश आणि संविधान वाचवण्याकरिता तसेच शेतकरी,शेतमजूर व सामान्य जनता यांना न्याय मिळावा त्याचबरोबर देशात स्वातंत्र्य,समता व बंधुभाव कायम रहावा,देशाची एकता अखंडित राहावी तसेच दलीत,आदिवासी,अल्पसंख्यांक आणि इतर सर्वच समजाला न्याय मिळावा व त्यांच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळावे आणि लोकसंख्यानुसार जनगणना करण्यात यावी यासाठी आम्ही येथे आलो असल्याचे खासदार राहुल गांधी यांनी यावेळी सांगितले.सदरहू खासदार राहुल गांधी यांच्या या उदारवादी विचारसरणीची देशातील तमाम जनता पूर्ण करेल असा आत्मविश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जलीलदादा सत्तार पटेल यांनी “पोलिस नाईक” वृत्तपत्राशी बोलतांना व्यक्त केला आहे.
नागपूर येथे आज रोजी काँग्रेसच्या १३८ व्या स्थापना दिनानिमित्ताने “है तय्यार हम”सभेचे आयोजन करण्यात आले.यात देशभरातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी जोरदार हजेरी लावली.प्रसंगी देशाचे पंतप्रधान राहुलजी गांधी,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नानासाहेब पटोले तसेच रावेर यावलचे लोकप्रीय आमदार शिरीषदादा चौधरी मंत्री व जि.प गटनेते आप्पासाहेब प्रभाकर सोनवणे हे चोपड्याचे आमदार होणार असल्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.तर ‘है तय्यार हम” या सभेतून एक विचार एक आदर्श आणि संदेश घेऊन देश आणि संविधान वाचविणे,शेतकरी,शेतमजूर व सामान्य जनता यांना न्याय मिळवून देणे,देशात स्वातंत्र्य,समता व बंधुभाव कायम राहून देशाची एकता अखंडता कायम राहावी आणि दलीत,आदिवासीं,अल्पसंख्यांक व इतर सर्वच समजाला न्याय मिळवून देणे,सर्व सामान्य जनतेच्या मुलांना चांगले दर्जेदार शिक्षण मिळवून देणे त्याचबरोबर लोकसंख्येनुसार जनगणना करण्यात यावी हि आमची पुढील वाटचाल राहील व याची खूणगाठ बांधण्याकरिताच आज आपण येथे जमले असून याबाबत देशातील प्रत्येक समाजबांधवाने आज हि भीष्म प्रतिज्ञा घ्यायची आहे.त्याचबरोबर देशातील दहशदवाद व हुकूमशाही उलथवून टाकून स्वातंत्र्य,समता व बंधुभाव असलेली महासत्ता येथे निर्माण करायची आहे असे आवाहन खासदार राहुल गांधी यांनी यावेळी देशातील प्रत्येक नागरिकास केले आहे.खासदार राहुल गांधी यांचे आवाहन देशातील जनता सार्थ ठरवतील असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस जलीलदादा सत्तार पटेल यांनी ‘पोलिस नाईक’ वृत्तपत्राशी बोलतांना मोठ्या आत्मविश्वासाने व्यक्त केला आहे.