Just another WordPress site

ताम्हिणी घाटात बस कोसळून झालेल्या अपघातात २ ठार तर ५५ जण जखमी

पुणे-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.३० डिसेंबर २३ शनिवार

ताम्हिणी घाटात खासगी मिनी बस कोसळून झालेल्या अपघातात एका महिलेसह दोघांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत.आज दि.३० डिसेंबर शनिवार रोजी पहाटे हा अपघात घडला असून बसमधील सर्व प्रवासी पुण्यातील असून ते कोकणात फिरण्यासाठी जात होते. जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून चालकाला वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याची शक्यता आहे.

पुण्यातून कोकणात पर्यटनासाठी सर्व जण जात असतांना सदरील अपघात झाला असून यात संजीवनी निवृत्‍ती साठे वय ५३,रा.औंध,पुणे आणि योगेश पाठक रा.नवी पेठ,पुणे अशी मृतांची नावे आहेत.तर पूनम लांडे,हर्षवर्धन लांडे,दक्ष जाधव,रियांश जाधव,ऋषा जाधव,ऋ‍षीकेश कोंढाळकर,शितल काळे,विशाल काळे,लौकिक काळे,स्मिता सूर्यवंशी,रेश्‍मा जाधव,पुष्‍पा कोंढाळकर,बाळासाहेब पवार,तनिष्‍का गोफणे, माणिक काळे,निवृत्‍ती साठे,अनघा जाधव,अनिल पवळे,प्रभा पवार,विधिता जाधव,श्रावणी पाठक,वाहनचालक (नाव समजू शकले नाही) अशी जखमींची नावे आहेत.सदर घटनेची आर्य केळकर वय १६,रा.वारजे याने पोलिसांना घटनेची माहिती दिली.सदरहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अपघातातील सर्व जण एकमेकांचे नातेवाइक व मित्र आहेत व ते कोकणात केळशी येथे फिरायला जात होते.पुण्‍याहून खासगी मिनी बसने आज पहाटे एक वाजता ते निघाले व पहाटे अडीच वाजता ताम्हिणी घाटात एका वळणावर ‘वाघुरणे’च्‍या ओढ्यात बस कोसळली. ओढ्याला पाणी नसल्याने बस पंधरा ते वीस फूट खाली दगडावर आदळली यामध्ये अनेकांना मोठ्या प्रमाणात मार लागला असून बसमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची संख्या मोठी होती.सदर अपघात झाला तेव्हा बसमधील अनेक जण झोपेत होते.या अपघातानंतर आर्य याने स्वत:ला सावरून परिस्थितीचा अंदाज घेतला व सर्व लहान मुलांना त्याने प्रथम बाहेर काढले नंतर रस्त्यावरून जाणाऱ्यांना त्याने मदतीसाठी विनंती केली.यावेळी अंधार व मोबाइलला रेंज नसल्‍याने मदत मिळण्‍यात अडथळे येत होते.ताम्हिणी,आदरवाडी,मुळशी खुर्द येथील संदीप बामगुडे,मयूर पासलकर,राम शिंदे आदींनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढण्‍यास मदत केली.जखमींना पौड,मुळशी ग्रामीण रुग्णालयासह व औंध येथील रुग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र संजीवनी साठे यांचा उपचारांपूर्वी तर योगेश पाठक यांचा उपचारादरम्‍यान मृत्‍यू झाला आहे.प्रसंगी आर्य केळकर हा आई-वडिलांसह वारजे येथे राहतो त्‍याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली असून  अपघातावेळी आर्य जागाच होता त्‍याला दुखापत झाली नसून त्‍याने तत्‍काळ स्‍वतःला अपघाताच्‍या धक्‍क्‍यातून सावरले व खिडकीतून तो बसच्या बाहेर पडला तसेच प्रसंगावधान दाखवून त्‍याने प्रथम लहान मुलांना गाडीबाहेर काढले व यानंतर रस्त्यावर धाव घेऊन त्याने नागरिकांकडे मदत मागितली.
Leave A Reply

Your email address will not be published.