यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३० डिसेंबर २३ शनिवार
तालुक्यातील बोरखेडा खुर्द ग्रामपंचायत ग्रामसेवक यांनी नवनिर्वाचीत सरपंच व उपसरपंच व सर्व सदस्य तथा ग्रामस्थ हजर असतांना ग्रामसभा न घेता दफ्तर घेवुन गावातुन निघुन गेले असून ग्रामसेवक यांनी व माजी सरपंच यांच्या कारर्कीदीत केलेल्या भ्रष्ठ कारभाराच्या विरोधात यावल पंचायत समितीत लोकनियुक्त सरपंच अकीला जहाँगीर तडवी,उपसरपंच ईकबाल बाबु तडवी आणि सर्व नवनिर्वाचित सदस्य यांनी प्रशासनाच्या नियमांना धाब्यावर ठेवुन कारभार करणाऱ्या भ्रष्ठ ग्रामसेवक यांची तात्काळ बदली व माजी सरपंच यांच्या कारभाराची त्वरीत चौकशी करून कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पाच तास कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्र्वर निळे यांना घेराव घातला.
बोरखेडा खुर्द तालुका यावल या ग्रामपंचायतची दोन महीन्यापुर्वी सार्वत्रिक निवडणुक पार पडली असून या निवडणुकीत नव्याने निवडून आलेल्या लोकनियुक्त सरपंच अकीला जहाँगीर तडवी,उपसरपंच ईकबाल बाबु तडवी नवनिर्वाचित ग्राम पंचायत सदस्य सिकंदर भिकन तडवी,सपना हसन तडवी,अलीशान अरमान तडवी,लता रविन्द्र चौधरी,तुकमान मिरखाँ तडवी, बेगम सायबु तडवी ,आरीफा जहॉंगीर तडवी, मेहेरबान हबीब तडवी या सर्व ग्राम पंचायत सदस्यांनी ग्रामसेवक आर डी तडवी यांच्या हमकरे सो कायदा अशा प्रकारच्या मनमानी कारभाराला व गावातील विविध मुलभुत सुविधांचा डोंगर वाढल्याने अखेर कंटाळुन सरपंच व उपसरपंच यांच्यासह ग्राम पंचायत सर्व सदस्यांनी काल यावल पंचायत समितीचे कार्यालय गाठले व ग्रामसेवक यांच्या बेजबाबदार वागणुकी बाबत कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्र्वर निळे व विस्तार अधिकारी हबीब तडवी यांच्याकडे तक्रार करीत संबधीत ग्रामसेवक आर.डी.तडवी यांच्या तात्काळ बदलीची मागणी केली आहे.दरम्यान मागील एक वर्षापेक्षा अधिक काळापासुन ग्रामसेवक यांच्याविरूद्ध यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांच्याकडे लोकप्रतिनिधी व विविध संघटनाच्या माध्यमातुन वारंवार तक्रारी देण्यात आल्या असतांना देखील या बाबीकडे पंचायत समिती प्रशासन हेतुपुरस्पर दुर्लक्ष करीत असल्याने संत्पत झालेल्या नवनियुक्त सरपंच व उपसरपंच,ग्राम पंचायत सदस्य यांनी कार्यालय अधिक्षक यांना चांगलेच धारेवर धरले व ग्रामसेवकास दफ्तर घेवुन पंचायत समितीमध्ये बोलवा अशी भुमिका घेतली मात्र तरी देखील ग्रामसेवक यांनी प्रशासनाच्या आदेशाला न मानता अखेर पर्यंत पंचायत समितीत आल्या नसल्या कारणाने अखेर सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी १२ वाजेपर्यंत ग्रामसेवक हजर न झाल्यास त्यांच्या विरूद्ध प्रशासकीय कार्यवाही प्रस्तावित करण्यात येईल असे लिखित आदेश काढण्यात आल्याने सोमवार पर्यंत सरपंच, उपसरपंच यांनी आपले आंदोलन दोन दिवसा साठी स्थगित केले आहे.दरम्यान पंचायत समितीत झालेल्या या घेराव आंदोलना प्रसंगी पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील,काँग्रेसचे शहराध्यक्ष कदीर खान,अमर कोळी यांच्या सह बोरखेडा खुर्द गावातील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठया संख्येने या प्रसंगी उपस्थित होते .