Just another WordPress site

गाव कामगार पोलीस पाटील संघ यावल तालुका संघटना कार्यकारणी घोषित

तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील,उपाध्यक्षपदी विशाल जवरे तर सचिवपदी राजरत्न आढाळे यांची निवड

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१ जानेवारी २३ सोमवार

यावल येथील जिनिंग प्रेस खरेदी विक्री संघाच्या सभागृहात सालाबादप्रमाणे आज दि.१ जानेवारी सोमवार रोजी ठीक १० वाजता गाव कामगार पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांच्या अध्यक्षतेखाली तालुका गावकामगार पोलीस पाटील संघाची बैठक संपुर्ण खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.

यावेळी तालुका कार्यकारणीची घोषणा पोलीस पाटील संघाचे राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी केली.कार्यकारणी पुढीलप्रमाणे असून यात पोलीस पाटील यावल तालुका संघटना तालुकाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील विरावली,उपाध्यक्षपदी विशाल जवरे पिळोदा बु,सचिवपदी राजरत्न आढाळे डोंगरकठोरा,तालुका संघटकपदी हरीश चौधरी पिंपरुळ,तालुका कार्याध्यक्ष पंकज बडगुजर सावखेडासीम,महिला तालुका उपाध्यक्षपदी रेखा सोनवणे किनगाव,प्रसिद्धीप्रमुखपदी चंदन पाटील सातोद,जेष्ठ मार्गदर्शकपदी मनोज देशमुख नायगाव व प्रवीण पाटील कासारखेडा,सदस्यपदी दिनेश बाविस्कर हिंगोणा,मुक्ता गोसावी राजोरा,सरिता तडवी मालोद,किरण पाटील बोरावल,प्रमोद तावडे निमगाव, महेमुद तडवी परसाडे,राकेश साठे चिंचोली यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकीत जिल्हापदाधिकारी म्हणून माधुरी राजपूत बोराळे व पंकज वारके यांची निवड करण्यात आली.यावेळी बैठकीला जिल्हाकार्याध्यक्ष अशोक पाटील गिरडगाव,जिल्हाउपाध्यक्ष पवन चौधरी अट्रावल,जिल्हासंघटक सुरेश खैरनार पाडळसा,प्रफुल्ला चौधरी म्हैसवाडी,जेष्ठ पोलीस पाटील दिलीप पाटील सांगवी बु,प्रसन्नकुमार पाटील हंबर्डी,नसीमा तडवी इचखेडा,उमेश पाटील डोणगाव,संतोष सुरवाडे करंजी,शारदा महाजन टाकरखेडा,दीपक पाटील कोळवद,विठ्ठल कोळी दगडी,अर्चना पाटील पिळोदा खु,सुनील बारेला वाघझिरा,लक्ष्मण लोखंडे भालोद,विकास बोदडे वढोदा प्र सावदा,चेतन सोनवणे वढोदा प्र यावल उपस्थित होते.प्रसंगी नवनिर्वाचित तालुका संघटनेचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सचिव तसेच सर्व नवीन कार्यकारिणी सदस्य यांची निवड झाल्याबद्दल सर्वांचे स्वागत व नवीनच निवड झालेले पोलीस पाटील बंधू आणि भगिनींचा सत्कार समारंभ बैठकीत संपन्न झाला.याप्रसंगी सभेचे प्रस्ताविक संघटनेचे जिल्हाउपाध्यक्ष पवन चौधरी यांनी करतांना त्यांनी यावल तालुका पोलीस पाटील संघाकडून येणारे प्रवासभत्त्याची कामे लवकरात लवकर मार्गी लागण्यासाठी तसेच पोलीस पाटलांना सुविधा होण्यासाठी काय काय करता येईल या संदर्भात मार्गदर्शन केले.तर  राज्यउपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन यांनी एकंदरीत संपूर्ण कामाचा आढावा घेतला आणि पुढील भविष्यातील अडीअडचणी संदर्भात मार्गदर्शक सूचना केल्या.सदरील सभेचे सूत्रसंचालन संघटनेचे नवनियुक्त तालुका सचिव राजरत्न आढाळे यांनी केले.

Leave A Reply

Your email address will not be published.