‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ मुल्यांकनासाठी तालुका कार्यकारणी निवड जाहीर
अध्यक्षपदी डॉ.मंजुश्री गायकवाड तर सचिवपदी महंमद तडवी व सदस्यपदी विश्र्वनाथ धनके यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२ जानेवारी २३ मंगळवार
राज्य शासनाव्दारे जिल्हा परिषद शाळांकरिता तालुका पातळीवर ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा’योजनेअंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ‘ अभियांन अंतर्गत पुरस्काराच्या निवडीसाठी मुल्यांकन करणाऱ्या समितीची नुकतीच निवड करण्यात आली आहे. यात तालुका समितीच्या अध्यक्षपदी यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ.मंजुश्री गायकवाड यांची व सदस्यपदी पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी विश्र्वनाथ चावदस धनके,हेमंत निकम,मुख्यधिकारी नगर परिषद यावल तर सचिवपदी सेवा जेष्ठ विस्तार अधिकारी डोंगर कठोरा जि.प. शाळा केंद्र प्रमुख महंमद तडवी यांची निवड शासन स्तरावर करण्यात आली आहे.
तालुक्यात दि.१ जानेवारी २४ पासुन ४५ दिवस या कालावधीसाठी हे अभियान संपूर्ण यावल तालुक्यातील जिल्हा परिषदच्या शाळा अंतर्गत चालु राहणार असुन यात मुल्यांकन समितीच्या वतीने शाळांचे मुल्यांकन करून निवड करण्यात आलेल्या शाळांचे प्रथम,द्वीतीय आणी तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यासाठी प्रस्तावित करण्यात येणार असल्याबाबतच्या माहितीचे निर्णय पत्र महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रिडा विभागाचे सह सचिव इम्तीयाज मुश्ताक काझी यांनी शिक्षण विभागाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.