यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ जानेवारी २३ बुधवार
केन्द्र शासनाने पारित केलेला देशातील वाहन चालकासाठीचा हिट अँण्ड रन जुलमी कायदा तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी यावल येथे आज दि.३ जानेवारी बुधवार रोजी जय संघर्ष वाहन चालक,वाहनमालक संघटनेच्या वतीने तहसीलदार व पोलीस निरिक्षक यांना निवेदन देण्यात आले.
या संदर्भात संघटनेच्या वतीने केन्द्र शासनाने बहुमताच्या बळावर मंजुर केलेल्या हिट अॅण्ड रन या कायद्याच्या विरोधात देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की,देशात,राज्यात किंवा कुठही वाहनाने अपघात घडल्यास जखमींना मृत्युच्या दारी सोडून पळुन जाणे ही बाब प्रत्येक मानवी मनाला पटण्यासारखी नाही.परन्तु स्वतःचा जीव वाचविण्यासाठी धडपड करणे हा गुण प्रत्येक प्राणीमात्रामध्ये जन्म जात असल्याकारणाने आणि आपल्या भारत देशात दलित आणी आदिवासी यांच्यासाठी जशी कठोर कायद्याची तरदुत आहे तशा एखाद्या कठोर कायद्याचे संरक्षण वाहन चालकास नसल्याने वाहनचालक हा केवळ स्वताः चा जिव वाचविण्यासाठी भितीने अपघात स्थळावरून पलायन करीत करतो.तरी केन्द्र शासनाने वाहनचालक सुरक्षा कायद्याची प्रथमतः अमलबजावणी करून हिट अॅन्ड रन रद्द करावा अशी मागणी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर व सहाय्यक पोलीस निरिक्षक विनोदकुमार गोसावी यांना दिलेल्या निवेदना द्वारे करण्यात आली आहे. सदरील निवेदनावर संघटनेचे यावल तालुका अध्यक्ष विजय कचरे,तालुका उपाध्यक्ष शैलेश वाणी,शहर अध्यक्ष हेमंत चौधरी,रफीक शेख, फिरोज तडवी,कुणाल शिंपी,महेन्द्र बारी,आयोध्याराम बारी,ईस्हाक कुरेशी,राजु कुटे,घनश्याम बैरागी (मिस्त्री),शैलेश बारी,दगडू पाटील, विलास बारी,नुकुल माळी,शफीक शेख,समिर तडवी,गोपाळ कुंभार,रूपेश धनगर,मनोज भोईटे,श्याम ठाकरे,नारायण कोळी,लालकृष्ण जाधव,भैय्या भोईटे,सचिन चौधरी,दिपक वराडे,कृष्णा वराडे,संदीप खैरे,शुभम चौधरी,एन.डी.तायडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षरी आहेत.