यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.३ जानेवारी २३ बुधवार
तालुक्यातील मारूळ येथील सरपंच सैय्यद असद अहमद जावेद अली यांची युवक कॉंग्रेस पक्षाच्या रावेर यावल युवक कॉंग्रेसच्या विधानसभा अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.मारूळ येथील लोकनियुक्त सरपंच व कॉंग्रेसचे निष्ठावान कार्यकर्त यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कॉंग्रेस पक्षासाठी केलेली तळमळ तसेच पक्षाच्या वाढीसाठी व प्रचार-प्रसार करण्यासाठी आजपर्यंत केलेले योगदान पाहून सय्यद असद अहमद यांची रावेर यावल युवक कॉंग्रेस विधानसभा अध्यक्षपदी निवड केली आहे.
सैय्यद असद अहमद यांची नियुक्ती जळगांव जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्या पत्राद्वारे करण्यात अली असून हे नियुक्तीपत्र सैय्यद असद अहमद जावेद अली यांना प्रदेश अध्यक्ष आ.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या हस्ते देण्यात आले.सदर निवडीचे युवक कॉंग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत,भारतीय युवक काँग्रेस व महाराष्ट्र युवक काँग्रेस प्रभारी उदय भानु,जळगाव जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब प्रदीप पवार,रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आ.शिरीष चौधरी,रावेर लोकसभेचे माजी खासदार उल्हास पाटील,यावल कॉंग्रेस कमेटीचे तालुका अध्यक्ष व जिल्हा परिषदचे माजी गटनेते प्रभाकर सोनवणे,यावल शहराध्यक्ष कदीर खान,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष प्रशांत ओगले,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उत्तर महाराष्ट्र प्रभारी राहुल माणीक,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस व जळगाव जिल्हा प्रभारी आंनद पुरोहीत,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सचिव आशुतोष पवार,महाराष्ट्र प्रदेश N.S.U.I. सरचिटणीस धनंजयभाऊ चौधरी, जळगाव जिल्हा N.S.U.I जिल्हाध्यक्ष भुपेंद्र मराठे,माजी आ.रमेश चौधरी,पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील,अनु.जाती विभागाचे अनिल जंजाळे यांच्यासह युवक कॉंग्रेस यांनी व रावेर यावल विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या नियुक्तीचे स्वागत करत सय्यद असद यांचे अभिनंदन केले आहे.