Just another WordPress site

“आता रक्तपेढ्या किंवा रुग्णालयांना रक्ताची विक्री करता येणार नाही ! रक्ताच्या पिशवीवर फक्त प्रक्रिया मूल्य आकारता येईल !!”-केंद्रीय औषध नियामक मंडळाचा निर्वाळा

रक्ताच्या पिशव्यांसाठी रक्तपेढ्यांकडून अव्वाच्या सव्वा किमती आकारण्यास बसेल आळा ?

या नियमावलीनुसार रक्ताची कुणालाही विक्री करता येणार नाही.रक्ताचा फक्त पुरवठा होऊ शकतो असे करतांना रक्ताच्या पिशवीवर कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नाही.रक्त रुग्णाला देण्याआधी त्यावर प्रक्रिया करून ते जतन करावे लागते त्यामुळे फक्त या प्रक्रियेसाठीचा खर्च रक्ताच्या पिशवीवर आकारता येईल असे डीसीजीआयने नमूद केले आहे.रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेले रक्त थेट कोणत्या रुग्णाला चढवले जात नाही तर त्या रक्तावर प्रक्रिया करूनच हे रक्त रुग्णाच्या शरीरात चढवता येते.रक्तदान शिबिरांमधून गोळा करण्यात आलेल्या रक्तामध्ये दात्याच्या शरीरातील इतरही घटक असतात हे घटक विलग करून लाल पेशी,पांढऱ्या पेशी,प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा अशा स्वरूपात हे रक्त शुद्ध केले जाते त्यानंतर ते योग्य अशा तापमानावर जतनही केले जाते या सर्व प्रक्रियेचा खर्च प्रक्रिया खर्चात समाविष्ट होतो मात्र याउपर कोणतेही विक्रीमूल्य आकारता येणार नाही असे डीसीजीआयने स्पष्ट केले आहे.दरम्यान केंद्राकडून २०२२ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियमावलीनुसार रक्तदात्याकडून घेण्यात आलेल्या रक्तावरचा प्रक्रिया खर्च हा १५५० रुपयांपेक्षा जास्त असू नये. लाल पेशी,प्लाझ्मा आणि प्लेटलेट्स यांच्यासाठी अनुक्रमे १५५०,४०० व ४०० रुपयांची मर्यादा घालून देण्यात आली होती.सरकारी रक्तपेढ्यांमध्ये हे मूल्य ११०० रुपयांपर्यंत निश्चित करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.