भारतीय लेवापाटीदार महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी जितेन्द्र पाटील तर कार्याध्यक्षपदी प्रविण परतणे यांची निवड
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.५ जानेवारी २३ शुक्रवार
तालुक्यातील फैजपूर येथील धनाजी नाना महाविद्यालयात भारतीय लेवा पाटीदार महासंघाची नुकतीच बैठक पार पडली.सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी रावेर यावल विधानसभा क्षेत्राचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी होते तर युवा नेते धनंजय चौधरी,प्रकाश पाटील,प्रकाश भोळे, प्रदीप भोळे,यावल पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर सोपान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस स्वर्गवासी धनाजी नाना चौधरी व सेनानी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अपर्ण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी भारतीय लेवा पाटीदार महासंघाच्या यावल तालुका अध्यक्षपदी दहिगाव येथील युवा सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र त्र्यंबक पाटील यांची तर कार्याध्यक्षपदी प्रवीण बाळकृष्ण परतणे भालोद यांची निवड करण्यात आली.प्रसंगी निवड करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांचे आमदार शिरीष चौधरी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.या बैठकीत राष्ट्रीय दिन यावल येथे साजरा करण्यात यावा तसेच महासंघाच्या कार्य प्रणाली व तालुका शहर आणि गाव कार्यकारणीसाठी समाजातील होतकरू तरुणांनी नवनिर्वाचित अध्यक्ष कार्याध्यक्ष यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन भारतीय लेवा पाटीदार महासंघाच्या वतीने करण्यात आले आहे.यावेळी बैठकीस लेवा पाटीदार समाजातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.