Just another WordPress site

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावे-खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांची महामार्ग प्राधिकरण विभागास सुचना

जळगाव-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.५ जानेवारी २३ शुक्रवार

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ बी तळोदा जंक्शन जवळ सुरु होणारा तळोदा-शिरपूर-चोपडा-यावल-फैजपूर-सावदा-रावेर या मध्यप्रदेश महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असलेल्या २४० किमी महामार्गाच्या चौपदरीकरण हे आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून करण्यात यावे अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित बैठकीत खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीषजी महाजन यांच्या मार्फत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,विभागीय अधिकारी,भोपाळ व नागपूर याच्याकडे केली आहे.

बुऱ्हानपूर-अंकलेश्वर महामार्गाच्या दर्जावाढ व चौपदरीकरणसाठी खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांचा मागील काही वर्षापासून केंद्र व राज्य स्तरावरील संबंधित मंत्री यांच्याकडे निरंतर पाठपुरावा सुरु होता त्यानुसार मागील वर्षी सदर राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आलेले असून सध्या देखभाल दुरुस्तीसाठी ६१.०० कोटी निधी वितरीत करण्यात आलेला असून चौपदरीकरणसाठी डीपीआर तयार झालेला असून सदर मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार असून रावेर व सावदा शहरास चौपदरीकरण मध्ये वगळण्यात असल्याची अफवा पसरविण्यात आली असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे.परंतु सदर मार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून न घेता स्थानिकांच्या मागणीनुसार आधीच्या मूळ मार्गानेच रावेर व सावदा शहरातून घेण्यात यावा यासाठी खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन मागणी केली असता त्यांच्या आदेशानुसार आज दि.५ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,विभागीय अधिकारी,भोपाळ व नागपूर यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बुऱ्हानपूर-अंकलेश्वर रस्ता चौपदरीकरण आधीच्या मूळ मार्गानेच करण्यात यावा तसेच सध्या चालू असलेली देखभाल दुरुस्ती वेग वाढविण्याबाबत संबधित कंत्राटदारास सुद्धा सूचना खा.श्रीमती रक्षाताई खडसे यांनी सदर बैठकीत केल्या.यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील,ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,मंत्री अनिल पाटील,खा.श्रीमती रक्षाताई खडसे,खासदार उन्मेष पाटील,आ.सुरेश भोळे,आ.संजय सावकारे,आ.किशोर पाटील,आ.सौ.लता सोनवणे,आ.मंगेश चव्हाण,आ.चंद्रकांत पाटील,जिल्हाधिकारी आयुष प्रसाद इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.