Just another WordPress site

ठाणे पोलीस कमीशनर आणि डोंबीवली डिव्हीजन झोन-३ कल्याणच्या वतीने आयोजित “हॅप्पी स्ट्रीट”कार्यक्रम उत्साहात

मिनाक्षी पांडव,पोलीस नायक

मुंबई विभाग प्रमुख

दि.८ जानेवारी २४ सोमवार

फडके रोड डोंबीवली येथे कल्याण झोन-३ चे डेप्युटी पोलीस कमिशनर सचिन गुंजाळ व डोंबिवली विभाग असिस्टंट पोलीस कमिशनर सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली काल दि.७ जानेवारी रविवार रोजी ठाणे पोलीस कमीशनर व डोंबीवली जीव्हीजन झोन ३ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅप्पी स्ट्रीट “ कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षी ठाणे पोलीस कमीशनर व डोंबीवली डिव्हीजन झोन ३ कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने “हॅप्पी स्ट्रीट” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.तद्नुसार यंदाही काल दि.७ जानेवारी रविवार रोजी जनतेच्या मनात पोलिसांवरील विश्वास वाढावा व त्यांच्यात भाईचाऱ्याचे वातावरण निर्माण व्हावे याकरिता सदरील “”हॅप्पी स्ट्रीट” कार्यक्रमाचे करण्यात आले.यानिमित्ताने फडके रोड डोंबीवली येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.प्रसंगी क्रिकेट,फुटबॉल,जिमन्याशीयम पथक,लंगडी पथक,ज्युडो कराटे पथक तसेच विविध वेशभूषित मंडळी यांच्या माध्यमातून संपूर्ण फडके रोड परिसर हा विविध रंगांनी नटविण्यात आला व पोलीस व जनता यांच्यात भाईचारा निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.सदर कार्यक्रमात डोंबीवली येथे कल्याण झोन-३ चे डेप्युटी पोलीस कमिशनर सचिन गुंजाळ व डोंबिवली विभाग असिस्टंट पोलीस कमिशनर सुनील कुराडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राजेश कुलकर्णी यांच्या स्वरांजली स्टुडीओचे सर्व गायक मंडळी,पोलीस बॅन्ड पथक, न्रु्य विशारद तेजस ठाकूर याचा झुंबा डांन्स ग्रुप,डोंबीवली पोलीस पथकातील राहुल मानगडे यांचे सर्व पोलीस अधीकारी व त्यांचे गायन पथक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सहभाग नोंदविला.

Leave A Reply

Your email address will not be published.