Just another WordPress site

“न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची?”-उद्धव ठाकरे यांचा सवाल

आमदार अपात्रता प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला जनतेच्या न्यायालयात प्रश्न

मुंबई-पोलीस नायक (वृत्तसेवा) :-

दि.९ जानेवारी २४ मंगळवार

आमदार अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एप्रिल,मे महिन्यात निकाल देतांना रिझनेबल वेळेत निकाल लावला पाहिजे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते.त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने ३१ डिसेंबरची मुदत दिली.त्यानंतर १० जानेवारीपर्यंत वेळ वाढवून दिली.माझी अशी अपेक्षा आहे की,१० जानेवारी रात्री ११.५९.५९ सेकंदांपर्यंत राहुल नार्वेकर वेळ खेचतील आणि आणखी वेळकाढूपणा करतील असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.आमदार अपात्रता प्रकरणावर उद्धव ठाकरेंनी हे भाष्य केले आहे.लवाद ज्यावेळी नेमून दिला जातो तेव्हा विधानसभा अध्यक्ष हे वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कसे काय जातात? असा प्रश्न उपस्थित होतो.यांची मिलिभगत आहे का?असा प्रश्न यामुळे निर्माण होतो आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.आता लवाद म्हणून विधानसभेचे अध्यक्ष असलेले राहुल नार्वेकर यांनी दोनवेळा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे.विधानसभेचे अध्यक्ष असे मुख्यमंत्र्यांना भेटू शकतात का? याचा अर्थ न्यायमूर्ती आरोपीला जाऊन भेटले आहेत असे झाले आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.आरोपीला दोनदा अध्यक्ष का भेटले? असा प्रश्न उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.एकनाथ शिंदे आमच्या दृष्टीने आरोपीच आहेत.न्यायमूर्तीच आरोपीला घरी जाऊन भेटत असतील तर कोणत्या निकालाची अपेक्षा करायची? असा आमचा जनतेच्या न्यायालयात प्रश्न आहे.आज उल्हास बापट यांच्याशी आम्ही चर्चा केली ते कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी म्हटले आहे की दोन महिन्यात ज्या खटल्याचा निकाल लागायला हवा होता त्यात दोन वर्षे काढली आहेत.ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळणे सुरु आहे त्यामुळे लोकशाहीचा खून होतो आहे का? अशी आता शंका निर्माण झाली आहे.

आरोपीला न्यायमूर्ती उघडपणे भेटत आहेत अशा गोष्टी घडत असतांना त्यांच्याकडून काय निकालाची अपेक्षा ठेवणार? जनतेला कल्पना आलीच असेल की आम्ही जनतेच्या न्यायालयात काम करणारे लोक आहोत हे सगळे लोकांच्या डोळ्यांदेखत घडते आहे.सर्वोच्च न्यायालयाकडून आम्हाला आता अपेक्षा आहे.न्यायमूर्ती म्हटल्यावर रामशास्त्री प्रभुणेंचे नाव आपल्यासमोर येते.त्यावेळी त्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता निवाडा केला होता.आमची अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडून आहे तसेच जनतेच्या न्यायालयातही आम्ही हा विषय मांडायचा म्हणून मी हे तुम्हाला सांगतो आहे असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाने जे निर्देश होते त्यात वेळकाढूपणा करण्यात आला आहे असाही आरोप उद्धव ठाकरेंनी केला.सध्याचे सरकार हे बेकायदेशीर सरकार आहे.जे दोन वर्षे महाराष्ट्रावर राज्य करते आहे जी गोष्ट लोकशाहीसाठी घातक आहे.ज्या गोष्टीचा निकाल उघडपणे लागायला हवा होता त्यासाठी दोन वर्षे काढली गेली आहेत तसेच उद्याही वेळकाढूपणा केला जाईल पुढची तारीख मिळेपर्यंत निवडणुका होऊन जातील असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.