यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या निवडणुकीत ८४ उमेदवारांचे ८८ अर्ज वैद्य
महाविकास आघाडीसह महायुतीचा या निवडणुकीत प्रवेश
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१० जानेवारी २४ बुधवार
येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या पंचवार्षीक निवडणुकीसाठी उमेदवारांच्या अर्जाची छाननी करण्यात आली.संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधणाऱ्या निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या उमेदवारांनी यात प्रवेश घेतला असुन येत्या २४ जानेवारी रोजी होणाऱ्या माघारीनंतर या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.सदरहू यावल खरेदी विक्री सहकारी संघाची दि.४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर ८४ उमेदवारांचे ८८ अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
या निवडणुकीत एकुण १७ संचालक निवडीसाठी २ हजार ८७३ मतदार व सहकारी सोसायटीचे ४५ मतदार या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील.यात शेतकी संघाच्या व्यक्तिशः मतदारसंघासाठी पाच जागांसाठी ३६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असुन सोसायटी मतदार संघाच्या ७ जागांसाठी २४ अर्ज,ओबीसी मतदारसंघाच्या १ जागासाठी १२ अर्ज,विमुक्त जाती भटक्या जमातीच्या १ जागासाठी ५ उमेदवारी अर्ज,अनुसुचित जाती जमातीच्या १ जागासाठी ५ अर्ज तर महिलांच्या राखीव २ जागांसाठी ८ अर्ज दाखल झाले आहे.याकामी सहाय्यक निबंधक सहकार संस्था कार्यालयाचे अधिकारी नंदकिशोर मोरे हे निवडणुक निर्णय अधिकारी हे काम पहात आहे.