एसटी बसचा प्रवास अधिक सुरक्षित असल्याने खाजगी वाहनांपेक्षा एसटी बसनेच प्रवास करा
वाहतूक सुरक्षा पंधरवाड्यानिमित्ताने अतुल पाटील यांचे प्रतिपादन
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.१३ जानेवारी २४ शनिवार
आपल्या एसटी बसचा प्रवास हा खाजगी वाहनांच्या मानाने अधिक सुरक्षीत असुन ईतर खाजगी वाहनांच्या तुलनेत होणाऱ्या अपघातात एसटी बसगाडयांच्या होणाऱ्या अपघाताची संख्या ही फारच कमी आहे.सदरहू अपघातास केवळ वाहनचालकच कारणीभुत नसतात तर अपघात टाळण्यासाठी सर्वप्रथम आपल्या परिसरातील रस्ते चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे.याशिवाय वाहन चालवित असतांना समोरील येणारे वाहन हे योग्य दिशेने येणे देखील महत्वाचे आहे अशी अनेक कारणही अपघातास कारणीभुत असतात त्यासाठी सर्व वाहन चालकांमध्ये जनजागृती करणे अत्यंत गरजे आहे असे मार्गदर्शनपर माहीती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी वाहतूक सुरक्षा पंधरवडा कार्यक्रम प्रसंगी दिली.
यावल एसटी महामंडळ आगाराच्या वतीने परिसरातील सभागृहात आयोजीत सुरक्षिता अभियान पंदरवाडयाच्या निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावलचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन संजय गांधी निराधार समितीचे नायब तहसीलदार मनोज खारे,प्रजापती ईश्वरीय बह्यमचारीय विद्यालयाच्या जयश्री दिदी यांच्यासह यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन आदी मान्यंवराच्या उपस्थित होते.सदरील कार्यक्रमाच्या सुरूवातीस मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले तर अतुल पाटील यांच्या हस्ते फित कापुन सुरक्षिता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. प्रसंगी आगार व्यवस्थापक दिलीप महाजन,जयश्री दिदी यांनी उपस्थित एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षिता याविषयी मार्गदर्शन केले. कार्यकमाचे सुत्रसंचलन व उपस्थितांचे आभार किशोर मंदवाडे यांनी मांडले.