Just another WordPress site

रिधुरी येथे रस्त्याच्या वादातून ५० वर्षीय वृद्धाचा खून तर पती-पत्नी गंभीर जखमी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१६ जानेवारी २४ मंगळवार

तालुक्यातील फैजपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिधुरी गावात काल दि.१५ जानेवारी सोमवार रोजी रात्री घराच्या वापराच्या रस्त्याच्या वादातून दोन कुटुंबात जोरदार मारामारी झाली.यात ५० वर्षीय एका प्रौढ व्यक्तीच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून खून करण्यात आला असून  या हाणामारीत एक जोडपे गंभीर जखमी झाले असल्याचे वृत्त हाती आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,रिधुरी गावात काल दि.१५ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता घराच्या वापराच्या रस्त्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद झाला व त्याचे रुपांतर नंतर हाणामारीत होऊन धनराज वासुदेव सोनवणे वय ५० यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यात आले.यात धनराज सोनवणे हे जागीच ठार झाले असून सतीश सुखदेव सोनवणे वय ३०,आरती सतीश सोनवणे वय २८ हे गंभीर जखमी झालेले आहे. यावल येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी दाम्पत्यावर प्राथमिक उपचार करून सदरील जखमी दाम्पत्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जळगाव येथे हलविण्यात आले.पुढील तपास फैजपूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.