Just another WordPress site

यावल शहरात श्रीराम मंदिर स्थापनानिमित्ताने दारू विक्री बंद करा : मनसेची मागणी

यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-

दि.१८ जानेवारी २४ गुरुवार

श्रीराम मंदिर स्थापना निमित्ताने शहरात येत्या २२ जानेवारी रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असुन या पार्श्वभुमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होवु नये यादृष्टीने स्थानिक पोलीस प्रशासनाने शहरात विक्री होणारी दारू विक्री बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,येत्या २२ जानेवारी रोजी आयोध्या येथे मर्यादा पुरूषोत्तम श्रीराम मंदिराची स्थापना होत असुन या निमित्ताने संपुर्ण देशात उत्साहाचे वातावरण आहे.सदरहू या दिनाचे औचित्य साधुन यावल शहरात दि.२२ जानेवारी सोमवार रोजी यावल शहरात श्रीराम यांच्या प्रतिमेची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात येणार आहे.यासाठी स्थानिक पोलिस प्रशासनाने दि.२२ जानेवारी रोजी शहरात मोठया प्रमाणावर विक्री होणाऱ्या दारू व पन्नीची दारू विक्रीमुळे एखाद्या दारूड्या समाजकंटक व्यक्तिकडुन शांतता भंग होवुन कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित होवु नये यासाठी शहरातील दारू बंद करावी अशी मागणी पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जनहित विभागाचे राज्य उपाध्यक्ष चेतन अढळकर यांनी दिलेल्या निवेदनाव्दारे केली आहे.या निवेदनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यावल तालुका अध्यक्ष किशोर नन्नवरे,तालुका उपाध्यक्ष शाम पवार,यावल शहराध्यक्ष गौरव कोळी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.