Just another WordPress site

दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद-उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

मुंबई-पोलीस नायक(वृत्तसेवा):-महाराष्ट्र राज्यात मोठया प्रमाणात गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक कोल्हापूर मार्गे होत असल्याचे  जिल्ह्यांच्या आढावा बैठकीत समजून आले आहे.गोवा बनावटीची दारू विक्री करण्याच्या रॅकेटमध्ये कोणकोण आहेत याचा अहवाल मागितला आहे.वारंवार दारू तस्करीचा गुन्हा केल्यास मोक्का लावण्याची तरतूद आहे.गृहविभागाशी चर्चा करून तसा प्रस्ताव पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत.गोव्याच्या दराने दारू राज्यात विकल्याने राज्याचे उत्पन्नात घट होत असून राज्याची आर्थिक हानी होत आहे.त्यामुळे वारंवार अशा प्रकारे परक्या राज्यातून दारू आणणाऱ्यांवर मोक्का लावण्याचे विचारधीन असल्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.दारू तस्करी हे गैरकृत्य असून गोवा राज्यातील दारू महाराष्ट्र विक्री केल्याने राज्याची हानी होत आहे.दारू तस्करीला काँग्रेसच्या सचिन सावंत यांचे समर्थन आहे का?असा प्रतिप्रश्न उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी सचिन सावंत यांना केला.

ईडीचा गैरवापर होत असेल तर गेल्या दीड वर्षांपासून त्यांचे मंत्री जेलमध्ये असून त्यांचे तिसरे नेते त्यांना भेटण्यासाठी २ महिन्यांपूर्वी आत गेले आहेत असे म्हणत संजय राऊत यांना टोला लगावला.ईडीच्या कारवाया चुकीच्या असत्या तर न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला असता. त्यांना जामीन दिला असता.ईडीचा राजकीय वापर कोणीही करत नाही.राज्यांच्या तिजोरीचे कोणी नुकसान करत असेल तर ते रोखण्याचे काम त्या विभागाचे मंत्री व अधिकारी करतील असेही मंत्री शंभूराज देसाई म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.