मधुसूदन कोवे,पोलीस नायक
यवतमाळ जिल्हा (प्रतिनिधी) :-
दि.१८ जानेवारी २४ गुरुवार
स्वर्गीय नेताजी राजगडकर माजी आमदार यांच्या जयंतीनिमित्त गरीब गरजू महिला आणि दिव्यांग व्यक्तींना नुकतेच ब्लॅंकेट वाटुन कृत्रज्ञता व्यक्त करण्यात आली.
सदरील कार्यक्रमाचे आयोजन नेताजी राजगडकर माजी आमदार विचार मंचच्या वतीने करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्ष बळवंतराव मडावी कार्याध्यक्ष प्रदेश कमेटी गोंडवाना गणतंत्र पार्टी हे होते तर मार्गदर्शक म्हणून मधुसूदन कोवे गुरुजी अध्यक्ष ग्राम स्वराज्य महामंच हे होते.तसेच प्रमुख पाहुणे म्हणून एम.के.कोडापे,धिरज मिलिंद धुर्वे,लक्ष्मणराव भिवनकर,शामा दादा कोलाम संघटना आणि गोंडी धर्म प्रचारक अंबादास सलामे,वर्षा आडे तालुका अध्यक्ष गोंडवाना गणतंत्र पार्टी,वनिष भोसले सरपंच,शैलेश गाडेकर युवा नेता म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मारोतराव जुमनाके कळंब यांनी केले.सर्व मान्यवरांनी स्वर्गिय नेताजी राजगडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या कर्तृत्वाची जानिव करत मान्यवर पाहुण्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.प्रसंगी आयोजन समितीचे प्रमुख महादेव सिडाम यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला म्हणून त्यांचे सर्वांनी कौतुक केले.या कार्यक्रमात सहभागी दोनशेच्या वर उपस्थित असलेल्या गरीब गरजू आणि दिव्यांग व्यक्तींना एक हात मदतीचा म्हणून ब्लॅंकेट वाटुन माजी आमदार नेताजी राजगडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार महादेव सिडाम यांनी मानले.