यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली पाटील व जावई राहुल साहेबराव पाटील राहणार जळगाव यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या मराठा उद्योजक महाअधिवेशनात शिवश्री राहुलदादा पाटील उद्योगरत्न पुरस्कार २४ या राज्यस्तरिय पुरस्काराने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.
तालुक्यातील दहिगाव येथील प्रगतशील शेतकरी भगवान महारु पाटील यांची कन्या दिपाली साहेबराव पाटील यांना अमरावती येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झालेल्या मराठा उद्योजक महाअधिवेशनात शिवश्री राहुलदादा पाटील उद्योगरत्न राज्यस्तरीय पुरस्कार २४ देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा दहिगाव येथे एका कौटुंबीक छोटेखानी कार्यक्रमात भगवान महारु पाटील प्रगतशील शेतकरी व सागर पाटील,चेतन पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी गावातील विविध क्षेत्रातील मंडळी व पाटील परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.