यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२३ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील डोंगर कठोरा येथील सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच येथील अच्युत धनाजी चौधरी विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचे वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांची महाग्लोबल राज्यस्तरीय-२४ पुरस्कारने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.आमदार राजुमामा भोळे यांच्या हस्ते मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.जळगाव येथील देवकाई प्रतिष्ठान व मिताली फाउंडेशन यांच्या वतीने जिल्ह्यातील सामाजिक,उपक्रमशील शिक्षक,मुख्यध्यापक,पत्रकार,उत्कृष्ठ बिवटिशियन,साहित्यिक यांना विविध पुरस्कार देऊन नुकतेच राज्यस्तरीय पुरकार देऊन गौरविण्यात आले.सदरील पुरस्कारादरम्यान सामाजिक कार्यकर्ता अशोक खंडू तायडे तसेच वरिष्ठ शिक्षक एन.व्ही.वळींकार यांना मेडल,ट्रॉफी व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला ऍडव्होकेट प्रकाश किसनराव दाते माजी वायू सेना अधिकारी कोशाध्यक्ष महाराष्ट्र मास्टर अथल्यांटिक्स असोसिएशन मुंबई,कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार राजुमामा भोळे,जयश्रीताई महाजन जळगाव महापौर,डॉ.सतीश कुलकर्णी सिने कलावंत आकाशवाणी सत्यशोधक चित्रपटात भूमिका साकारलेली प्राचार्य मध्य रेल्वे कल्याण,सचिन कुमावत खान्देशी मराठी सिने अभिनेता,अनिल मोरे मराठी सिने अभिनेता (मोल येरे येरे पावसा फेम ),संघपाल तायडे मराठी सिने गायक,प्रो,रफिक शेख एच.ओ.डी.डिपार्मेंट ऑफ कॉम्प्युटर एप्लिकेशन जी. एच.रायसोनी कॉलेज,मंदाताई सोनवणे अध्यक्ष देवभूमी प्रतिष्ठान जळगाव,पी.एम.वाघ राज्यध्यक्ष कोचिंग क्लास महाराष्ट्र राज्य,दिनेश गवळे प्रकल्प अधिकारी जिल्हा उदयोग केंद्र जळगाव,विजय पवार संचालक ग.स.सोसायटी जळगाव शिक्षण विस्तार अधिकारी जि.प.जळगाव, प्रतीक्षा मनोज पाटील मुख्यध्यापिका श्री.स्वामी समर्थ विद्यालय कुसुम्बा,सुनील दाभाडे अध्यक्ष देवकाई फाउंडेशन जळगाव,डॉ.रवींद्र भोळे जेष्ठ समाजसेवक प्रवचनकार अपंग सेवक उरुळी कांचन पुणे,विनोद महाजन अध्यक्ष मिताली फाउंडेशन जळगाव,ह.भ.प.कु.माईसाहेब महाराज जळगावकर राष्ट्रीय समाज प्रबोधनकार यांच्यासह पत्रकार,मुख्यद्यापक,सामाजिक कार्यकर्ता, साहित्यिक तसेच जिल्ह्याभरातील विविध क्षेत्रातील मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती ज्योतीताई राणे यांनी केले तर अनमोल सहकार्य किशोर पाटील व हेमंत बडगुजर यांचे लाभले.