डॉ.सतीश भदाणे,पोलीस नायक
चोपडा तालुका (प्रतिनिधी) :-
दि.२३ जानेवारी २४ मंगळवार
तालुक्यातील चोपडा-वर्डी फाट्यावर तीन आरोपी संशयित रित्या उभे असतांना अडावद पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले.सदरहू त्यांची चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुस तसेच एक मोटार सायकलसह या तिन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की,तालुक्यातील चोपडा-वर्डी फाट्यावर तीन संशयित तरुण उभे असल्याची गुप्त बातमी अडावद पोलिसांना मिळाली व त्या अनुषंगाने पोलीसांनी तीनही जणांना ताब्यात घेऊन त्यांची कसुन चौकशी केली असता त्यांचा ताब्यातील २५ हजार रुपये किमतीचा एक गावठी कट्टा,दोन हजार रुपये किमतीचे २ जिवंत काडतुस तसेच २५ हजार रुपये किमतीची मोटार सायकल असा एकुण ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरहू गजानन नामदेव पाटील वय २६ रा.वर्डी ता.चोपडा,अमोल हुकूमचद धनगर वय २५ रा.वर्डी ता.चोपडा,कुणाल समाधान कोळी वय २७ रा शिंदेवाडा चोपडा या तीनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपीं विरुद्ध अडावद पोलिस स्टेशनला ४/२०२४ शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३,२५ प्रमाणे पोहेकॉ.नशीर तडवी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ.संजय धनगर हे करीत आहेत.