परसाडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने विविध क्षेत्रातील उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार
यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार
तालुक्यातील परसाडे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येला राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त अधिकारी व शिक्षका यांच्यासह जेष्ठ पत्रकार यांच्या सत्काराचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
तालुक्यातील परसाडे गावातील जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात काल दि.२५ जानेवारी गुरुवार रोजी संपन्न झालेल्या या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यावल सार्वजानिक बांधकाम विभागाचे उपअधिकारी जे.एस.तडवी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके,पोलिस पाटील संघाचे राज्य उपाध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन,पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष अशोक पाटील,वड्री सरपंचपदी अजय भालेराव,डोंगर कठोरा सरपंच नवाज तडवी,विविध गावातील नवनियुक्त पोलीस पाटील व पत्रकार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व परसाडे ग्रामस्थ मंडळी या कार्यक्रमा प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने राज्य शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त परसाडे जिल्हा परिषद मुलींच्या शाळेच्या शिक्षीका कल्पना देविदास माळी,महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात आलेला राज्यस्तरिय पुरस्कार प्राप्त सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी जहाँगीर एस तडवी यांच्यासह जेष्ठ पत्रकार अरूण पाटील,पत्रकार अय्युब पटेल व पत्रकार रणजित भालेराव यांचे देखील यावेळी गुणगौरव सत्कार करण्यात आले.दरम्यान कार्यक्रमात सर्वप्रथम शाळेतील विद्यार्थीनीनी देशभक्तीपर वंदे मातरम् या गाण्यावर सुन्दर असे नृत्य सादर व स्वागत गीत म्हणत उपस्थितांची मने जिकंली.कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलनाने करण्यात आली,या सत्कार सोहळा कार्यक्रमाचे प्रस्ताविक परसाडे सरपंच मिना राजु तडवी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षीका ज्योती जाधव यांनी केले,