पुणे-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी)व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) येत्या फेब्रुवारी-मार्च २४ परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना आता १० मिनीटे वाढवून मिळणार आहे.
इ.१२ वी व इ.१० वी परीक्षेस प्रविष्ट होणा-या परीक्षार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी (आकलन होण्यासाठी) परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वाटप परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटेअगोदर करण्यात येत होते.इ.१० वी व इ.१२वी च्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक महत्वपूर्ण टप्पा असल्यामुळे पालक व समाज घटक यांचे या परीक्षांकडे बारकाईने लक्ष असते परंतु प्रश्नपत्रिका मोबाईलवर तसेच अन्य समाज माध्यमातून व्हायरल झाल्याच्या अफवा व काही अंशी अशा घटना निदर्शनास आलेल्या आहेत.अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध व्हावा तसेच परीक्षा निकोप,भयमुक्त व कॉपीमुक्त वातावरणात सुरळीत पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारीत वेळेपूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका वितरीत करण्याची सुविधा होती पण फेब्रुवारी-मार्च २३ परीक्षेपासून रद्द करण्यात आलेली होती.तथापि विद्यार्थी हित लक्षात घेवून व पालक, विद्यार्थी यांच्या मागणीचा विचार करून सदरची दहा मिनिटे परीक्षेच्या निर्धारित वेळेनंतर गतवर्षीप्रमाणे फेब्रुवारी-मार्च २४ परीक्षांसाठी खालीलप्रमाणे वेळ वाढवून देण्यात येत आहे.फेब्रुवारी-मार्च २४ परीक्षांचे वेळीही सकाळ सत्रात स.११ वाजता तसेच दुपार सत्रात दु.३ वाजता परीक्षा दालनात प्रश्नपत्रिकांचे वितरण करण्यात येईल व लेखनास प्रारंभ होईल.सकाळ सत्रात स.१०.३० वाजता तसेच दुपार सत्रात दु.२.३० वाजता परीक्षार्थीने परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.परीक्षेची सध्याची वेळ स.११ ते दु. २ सुधारित परीक्षेची वेळ ११ ते दु.२.१०.दुपार सत्र ३ ते ५ सुधारित वेळ ३ ते ५.१० म्हणजे दहा मिनिट ज्यादा वेळ हा निर्धारित वेळेनंतर मिळणार आहे असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ पुणे राज्य सचिव अनुराधा ओक यांनी एका पत्रकान्वये कळवले आहे.