यावल-पोलीस नायक (प्रतिनिधी) :-
दि.२६ जानेवारी २४ शुक्रवार
येथील श्री मनुदेवी आदिवासी शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये भारताचा ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने ध्वजारोहण मोठ्या उत्साहात करण्यात आले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे संचालक शशिकांत फेगडे तसेच माया तडवी या उपस्थित होत्या.या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने उपस्थित प्रमुख शाळेचे संचालक शशीकांत फेगडे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले व राष्ट्रीय ध्वजाला राष्ट्रगीताने सलामी देण्यात आली.याप्रसंगी सामुहीकरित्या तंबाखू मुक्तीची प्रतिज्ञा घेण्यात आली.या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले व नंतर कार्यक्रमास सुरुवात झाली.कार्यक्रमात सर्वच विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता व अत्यंत सुंदर असे देशभक्तीपर गीत गाऊन तसेच सर्व भारतीय नेत्यांच्या भूमिका साकारून आजचा कार्यक्रम अत्यंत उत्साहात व जल्लोषात पार पाडला.प्रसंगी संस्थाअध्यक्ष राजेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि.२६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला.याप्रसंगी प्रशांत फेगडे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद व कर्मचारी वर्ग या कार्यक्रमास उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती भोईटे यांनी केले.